राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ७ वे महाअधिवेशन ७ ऑगस्ट ला नवी दिल्ली येथे

ओबीसींना एकत्र येण्याचे आव्हान : चिराग काटेखाये

     भंडारा : ७ ऑगस्ट ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ७ वे महाअधिवेशन तालकटोरा इंडोर स्टेडियम न्यू दिल्ली येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित केले आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या मार्गदर्शनात अधिवेशनाची तयारी सुरु आहे.

    ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी, केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन व्हावे, कलम २४३(ळ) व २४३(ऊ) सेक्शन ६ मध्ये बदल करून ओबीसींना २७ टक्के आरक्षण साठी प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी वसतिगृहासाठी, ओबीसी विद्याथ्यांना १०० टक्के स्कॉलरशिप मिळण्यासाठी ओबीसी शेतकऱ्यांना १००टक्के सबसिडी वर योजना लागू करण्यात याव्या. ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळण्यासाठी, क्रिमिलियरची मर्यादा वाढवण्यासाठी व राज्याच्या व केंद्राच्या इतर मागण्या मंजूर करून घेण्यासाठी या बाबींवर अधिवेशनात मंथन होणार आहे. या अधिवेशनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, छत्तीगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तामिळनाडुचे मुख्यमंत्री स्टॅलीन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भगवान कराड, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, माजी मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष जस्टीस ईश्वरया, माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री महादेव जानकर, माजी मंत्री जयदत्त सिरसागर, खासदार गणेश सिंग, खासदार वड्डीराजू रवींद्र, खासदार बडुला यादव, खासदार राम मोहन नायडू,खासदार राम चंद्रा जागरा, खासदार बाळूभाऊ धानोरकर, खासदार रामदार तडस, खासदार सुशील मोदी, खासदार विलसन, माजी केंद्रिय मंत्री हंसराज अहर, खासदार डॉ. के. लक्ष्मण, खासदार भारत मागणी, खासदार मिसा भारती, माजी खाजदार राजकुमार सैनी, आमदार किसन कातोरे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार भाई जयंत पाटील, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रामकुमारी ढिल्लोन, आमदार परिणय फुके, माजी मंत्री संजय कुटे यांच्यासह इतरही मान्यवरांना निमंत्रित केले आहे.

Rashtriya OBC mahasangam Mahaadhiveshan New Delhi    या अधिवेशनाला देशभरातून असंख्य कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाची जय्यत तयारी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, सहसचिव शरद वानखेडे, महामंत्री मुकेश नंदन, प्रा. शेषराव येलेकर, युवा महासंघाचे अध्यक्ष सुभाष घाटे, डॉ. सुधाकर जाधवर, इंजी. रमेशचंद्र घोलप, गुणेश्वर आरिकर, मनोज चव्हाण, रेखा बारहाते, सुषमा भड, प्रदेशाध्यक्ष प्रकाश भागरध, युवाचे प्रदेशाध्यक्ष चेतन शिद, कर्मचारी महासंघाचे श्याम लेडे, महिला महासंघाच्या कल्पना मानकर, कर्मचारी महिला महासंघाचे रजनी मोरे करीत आहेत.

    या अधिवेशनात भंडारा जिल्ह्यातील नेतेमंडळी सेवकभाऊ वाघाये, सुनील फुडे गंगाधर जिभकाटे, चरण वाघमारे, मधुकर कुकडे, रामलाल चौधरी, रमेश पारधी, स्वाती वाघाये, विलास वाघाये, सदानंद इलमे, उमेश काठाने, बालू सेलोकर, धनराज साठवणे, सुधाकर कारेमोरे, प्रभाकर सपाटे, ज्ञानेंद्र आघासे, विजय गिरेपूंजे, सुरेश खोब्रागडे, विनोद बाबारे,एकनाथ कातोरे उपस्थित राहणार आहेत.

    या अधिवेशनाला जिल्यातील सर्व ओबीसींनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान जिल्हाध्यक्ष डॉ. मुकेश पुडके, युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चिराग काटेखाये, उपाध्यक्ष महेश पंचभाई, समीर पंचभाई, अविनाश जिभकाटे, तिमिर माकडे, साहिल गिरेपुंजे, सुरज बिलवणे व आदी पदाधिकाऱ्यांनी केला.

 

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Periyar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209