जत - खोजनवाडी बसव मंडप येथे राष्ट्रीय बसवदल वाढदिवस व बसवधर्मपीठ कुडलसंगमचे लिंगैक्य महाजगद्गुरु लिंगानंद महास्वामीजी यांची जयंती साजरा करण्यात आले.
महात्मा बसवेश्वर व लिंगानंद आप्पाजी फोटो पूजन करून एम.जी. काराजनगी सर यांनी म्हणाले, भारताचा पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूजी यांचे जन्मदिन ज्या पद्धतीने बालदिन म्हणून साजरा करण्यात येते.त्या पद्धतीने लिंगानंद आप्पाजींचे जन्मदिन राष्ट्रीय बसवदलचे जन्मदिन म्हणून साजरा करण्यात येतो.
सामूहिक प्रार्थना करून शरण संगमेश हिप्परगी म्हणाले, लिंगानंद अप्पाजी बसवतत्व प्रचार करत असताना अनेक कष्ट भोगले आहे. त्यातील एक उदाहरण म्हणजे आप्पाजी प्रवचन करताना एका ठिकाणी एका अज्ञानी व्यक्तीने दगडफेक केला रक्त येत होते तरी सुद्धा एक तासभर प्रवचन केले. त्यावेळी म्हणाले माझ्या या रक्ताच्या एकेक थेंबातून एकेक बसवतत्व प्रचारक जन्मतील असे भावनिक उद्धार त्यावेळी आप्पाजीने काढले.
बसवधर्मापीठ कोणाला संगमच्या हजारो शाखा महाराष्ट्र,कर्नाटक,आंध्र प्रदेश, तेलंगणा,दिल्लीपर्यंत अशा अनेक राज्यात आज राष्ट्रीय बसव दल कार्यरत आहे.आर एम कनाळ सर,बसवराज भडकुंद्रे,सदाशिव बिद्री,हनुमंत करोली, आर एस बामणे आदी उपस्थित होते.
Satyashodhak, Mahatma phule, Bahujan