ओबीसी आरक्षणाच्या हक्कासाठी १८ जुलै २०२२ सोमवार रोजी सकाळी ११ वा. जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ओबीसी मोर्चा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणूका तोंडावर येऊन ठेपलेल्या असताना देखील ओबीसी आरक्षणा संदर्भात काही ठोस निर्णय होऊ शकला नाही तसेच यापुर्वी देखील झालेल्या नगर पंचायत निवडणुकीत आम्ही ४६५ ओबीसीच्या जागेला मुकलो आहोत. खरे तर ओबीसी समाजाचे सभागृहात प्रतिनिधी जसणे हे घटनेचे अवमुल्यन तर आहेच शिवाय ओबीसी समाजाचे पुन्हा न भरुन निघणारे नुकसान देखील आहे. सगळेच पक्ष ओबीसी बद्दल सहानुभूती दाखवुन व एकमेकांवर टोलवा-टोलवी करुन वेळ मारून नेत आहेत. त्यामुळे दुसऱ्याच्या भरोषावर न राहता आता आपली लढाई आपल्यालाच लढायची वेळ आली आहे. त्याचबरोबर आज राजकीय आरक्षण धोक्यात आले, उद्या शैक्षणिक आरक्षणाला हात घातला जाईल आणि आत्ता आपण गप्प बसलोत तर त्याची किंमत येत्याकाळात आमच्या लेकरा बाळांना चुकवावी लागेल. त्यामुळे याचा वेळीच प्रतिकार करण्यासाठी आणि जिल्ह्यातील ओबीसींची एकजुट दाखवण्यासाठी येणाऱ्या १८ जुलै २०२२ सोमवार रोजी सकाळी ११ वा. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चात सर्व ओबीसी | बांधवांनी आपल्या कुटुंबासह सहभागी व्हावे असे आवाहन आपणास करण्यात येत आहे. मागण्या १) ओबीसी आरक्षण कायम ठेवा... ३) ओबीसी आरक्षण लागु होई पर्यंत निवडणूका पुढे ढकला... २) ओबीसीची जात निहाय जनगणना करा.... ४) मंडल आयोगाच्या संपूर्ण शिफारशी लागु करा.. सूचना : मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी सर्व समाजबांधवांनी शनिवार बाजार परभणी येथे जमावे.
विनीत: ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समिती, परभणी