पुणे, दि. ९ - 'चीनच्या विस्तारवादाने तैवानसह तिबेटच्या अस्तित्वाला घायाळ केले. त्यामुळे चिनी हिटलरशाहीचा धोका समूळ विश्वातीला निर्माण झाला आहे. दलाई लामा यांना हिंदुस्थानने आश्रय देऊन बौद्धांच्या करुणेचा सन्मान केला आहे. या कृतीतून हिंदुस्थान विश्वशांतीचा कैवारी असल्याचे सत्य पुन्हा सिद्ध झाले आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
'दलित पॅन्थर संघटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आडकर फाऊंडेशनतर्फे दलित पॅन्थरचे नेते बापू भोसले यांना डॉ. सबनीस यांच्या हस्ते 'पॅन्थररत्न पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 'आडकर फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर, 'रमाई महोत्सव समिती'चे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, शिवसेनेचे उपशहरप्रमुख डॉ. अमोल देवळेकर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, शाहीर संभाजी भगत, माजी नगरसेवक, रवींद्र माळवदकर, माजी नगरसेविका लता राजगुरू, प्रेरणा गायकवाड यावेळी उपस्थित होते. पुरस्कारार्थी बापू भोसले, माजी महापौर अंकुश काकडे, संभाजी भगत, रवींद्र माळवदकर, डॉ. अमोल देवळेकर, लता राजगुरू यांचीही यावेळी भाषणे झाली. अॅड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.
Satyashodhak, obc, dr Babasaheb Ambedkar, Periyar, Bahujan