ऑम्वेट, प्रा. हरी नरकेंना 'गोविंद पानसरे' पुरस्कार

बावा, शेख, थोरातांचा 'सामाजिक कार्यकर्ता'ने सन्मान

     नाशिक, ता. ११ : कॉमेड गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत गेल ऑम्वेट यांना गेल्या वर्षीचा मरणोत्तर, तर यंदाचा ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांना जाहीर झाला आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार युवराज बावा, आबासाहेब थोरात व इरफान शेख यांना जाहीर करण्यात आला आहे.

Govind pansare Puraskar to pradhyapak Hari Narke    पुरस्कार निवड समितीत ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. गोपाळ गुरू, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांचा समावेश होता. पुरस्कार समितीचे अध्यक्ष श्री. कांबळे आणि समन्वयक डॉ. मिलिंद कसबे यांनी पुरस्कारार्थीच्या नावांची घोषणा केली. प्रबोधन पुरस्काराचे २५ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे स्वरूप आहे. सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारार्थीना दहा हजार रुपये (प्रत्येकी) आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येईल. समर्पित सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार विजेते श्री. बावा हे नाशिकचे आहेत. त्यांनी गेली ५० वर्षे निःस्वार्थपणे प्रबोधनाचे काम केले आहे. श्री. थोरात हे तरुणांना संघटित करून कार्यरत आहे. श्री. शेख हे कम्युनिस्ट चळवळीत कार्यरत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा दिला आहे. पुरस्कारांचे वितरण नाशिकमध्ये होणार आहे. या अगोदर मुक्ता मनोहर, दत्ता देसाई, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाहीर शीतल साठे, किरण मोघे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, असे डॉ. कसबे यांनी सांगितले.

 

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209