चंद्रपूर : छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ओबीसी सेवा संघ चंद्रपूरच्या वतीने जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन ॲड. पुरुषोत्तम सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. दत्ता हजारे, डॉ. कांबळे, हिराचंद बोरकुटे, आनंदराव वनकर, प्रा. माधव गुरनुले, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल डहाके, महासचिव अॅड. विलास माथनकर, सचिव विवेक बोरीकर, कोषाध्यक्ष सचिन बावणे, उपाध्यक्ष संजय गाते, सुरेश गिलोरकर, भाविक येरगुडे, मंगेश बोढाले उपस्थित होते. यावेळी अॅड. सातपुते यांनी, ओबीसी सेवा संघ तळागळातील लोकांसाठी काम करणारी संघटना आहे. यामध्ये युवकांनी सहभागी होऊन नेतृत्व करावे, असे आवाहन केले. आयोजनासाठी महानगर अध्यक्ष कुशाल काळे, प्रा. प्रवीण उपरे, संतोष बोबाटे, दीप्ती वाकुलकर, पूनम रामटेके, प्रलय म्हशाखेत्री, अनिकेत दुर्गे, शिवा रेड्डी, गणेश तेलंग, चेतन वैद्य, सुनील वांढरे, गौरव तेलंग, संकेत गौरकार यांनी सहकार्य केले.