गडहिंग्लज : हिंदुत्ववादी राजकारणाला शह देण्यासाठी गांधी, नेहरू आणि आंबेडकरांच्या विचारांची नव्याने मांडणी करायला हवी. किंबहुना, त्यातूनच राजकारणाचा नवा प्रवाह उदयाला येईल, असा आशावाद राजकीय विश्लेषक प्रा.डॉ. प्रकाश पवार यांनी व्यक्त केला.
ज्येष्ठ विचारवंत प्रमोद मुजुमदार लिखित 'हिंदुत्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा' पुस्तकावरील चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य जे. बी. बारदेस्कर होते. कॉ. संपत देसाई, सुभाष कोरे प्रमुख उपस्थित होते. नगरपालिकेच्या शाहू सभागृहात हा कार्यक्रम झाला. पवार म्हणाले, जात, धर्म, वर्ग आणि संस्कृती यांचे आकलन म. गांधी, पंडित नेहरू व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना होते. त्यामुळे त्यांनी भारतीय म्हणूनच समाजाकडे पाहिले; परंतु हिंदत्वापेक्षा वेगळा विचार सांगणाऱ्या या तिघांनाही एकमेकांचे वैचारिक विरोधक भासवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मुजुमदार म्हणाले, 'देशाला हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी जातिव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनाबरोबर हिंदुत्ववादी अस्मिता तयार केली जात आहे. त्यात उद्योगपती आघाडीवर असून, सनातनी य्यम स्थानावर आहेत. प्रा. सुभाष कोरे यांनीही चर्चेत भाग घेतला. आजरा कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे, नागेश चौगुले, कल्याणराव पुजारी, पी. डी. पाटील, शिवाजीराव होडगे, ज्ञानराजा चिघळीकर, आप्पासाहेब कमलाकर, रेखा पोतदार उपस्थित होते. कॉ. संपत देसाई यांनी प्रास्ताविक केले. सुरेश दास यांनी सूत्रसंचलन केले. अरविंद बारदेस्कर यांनी आभार मानले.
गीता प्रेस'च्या माध्यमातूनच हिंदू राष्ट्र उभारणीचा प्रचार-प्रसार सुरु आहे. व्यावसायिक व्यवहारवाद जपण्यासाठीच बड्या उद्योगपतींकडून त्याला पाठबळ दिले जात आहे, अशी टिप्पणी मुजुमदार यांनी केली.
Satyashodhak, obc, dr Babasaheb Ambedkar, Periyar, Bahujan