नाशिक जिल्ह्यातील सत्यशोधकांचे स्मारके उभारणार : डॉ. सुरेश झाल्टे

   मुंजवाडा  : सत्यशोधक समाजाच्या शतकोतर सुवर्ण महोत्सव व सत्यशोधक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मदिना निमित्‍त दिनांक २८ जून २०२२ रोजी मुंजवाड येथे नाशिक जिल्हा सत्यशोधक परिषद संपन्न झाली.

   सदर परिषदेणे उद्घाटन माननीय नीलिमाताई पवार, नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद खैरणार यांनी केले.

Nashik Jilla satyashodhak Smarak   उद्घाटन प्रसंगी निलीमाताई म्हणाल्या की संस्थेची निर्मिती महात्मा फुले व छत्रपती शाहू महाराज यांच्या सत्यशोधक विचारधारेवर झालेली आहे. ही संस्था अठरा पगड जातीच्या सर्व धर्माच्या विद्यार्थ्‍यांसाठी शिक्षण देण्यासाठी कार्य करते. यानंतर नानासाहेब उतमराव पाटील तरवडी यांना सत्यशोधक समाज संघातर्फे जीवनगौरव पुरस्कार नीलिमा ताई पवार व विचार मंचावरील उपस्थितांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. उत्‍तमराव नाना यांनी सत्यशोधक चळवळीचे मुखपत्र दिन मित्र या साप्ताहिकाची संघर्षमय कथा श्रोत्यांसमोर मांडली.

  नवीन पिढीने सत्यशोधक पद्धतीचा व विधीचा अवलंब करण्याचे आग्रहाचे आवाहन केले.

   प्राध्यापक अशोक सोनवणे सर नाशिक यांनी नाशिक जिल्ह्यातील सत्यशोधक चळवळीचा इतिहास सविस्तरपने मांडला. त्यानंतर माननीय प्राध्यापक जी. ए. उगले सर यांनी बहुजन, वंचित आणि स्त्रिया या घटकांच्या संदर्भातील सत्यशोधक समाजाचे मूलगामी विचार मांडले. बहुजन समाजाने धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होणेसाठी इहवादी, जीवनवादी, विज्ञानवादी इत्यादी विद्यार्थी घडविण्याचे आवाहन केले. त्यानंतर अध्यक्षीय समारोपात डॉक्टर सुरेश माल्टे यांनी सत्यशोधक चळवळ ही शिक्षण, शेती व संस्कृती या तीन बहुजन मूल्यच्या विकास करणारी आहे. तरी समाजाने स्वतःची व समाजाची प्रगती करून घेण्यासाठी सत्यशोधक चळवळ व सत्यशोधक पद्धतीने जीवनातील सर्व प्रकारचे विधी करणे गरजेचे आहे. शूद्र अतिशूद्र व स्त्रियांनी वैदिक संस्कृती नाकारून आपली मूळ कृषी संस्कृती म्हणजेच आपले कुलदैवत व ग्रामदैवत यांच्या विचारानेच जीवन जगलं पाहिजे. या परिषदेला विश्वासराव मोरे प्रकाशराव कवडे प्राध्यापक वसंतराय गोवर्धने सटाण्याचे नगराध्यक्षा सुनील मोरे महात्मा फुले शिक्षण संस्थेचे चेअरमन गोकुळ राय जाधव, जिल्हा परिषद सदस्य मीनाताई मोरे, मुंजवाडच्या सरपंच पवार ताई, विलास दंडगमव्‍हाळ धुळ्याचे राजकिशोर तायडे, पिंपळनेरो सत्यशोधक सुभाष जगताप, चाळीस गावचे सत्यशोधक भगवन रोकडे, नरेंद्र खैरनार, रोहित तरटे, गोविंद वाघ, प्रा. आण्णा माळी, विलासराय माळी, प्राचार्य जाधव, अनिल बोरसे,  आप्‍पा जगताप,  आदी मान्यवर उपस्थित होते. मुंजवाड गावातील पंचक्रोशीतील अनेक स्त्रि - पुरुष, विद्यार्थी शिक्षक, शेतकरी, व्यापारी या परिषदेत मोठया संख्येने उपस्थित होते. या सत्यशोधक परिषदेत २ मे १९३७ रोजी मुंजवाड येथे झालेल्या दिन मित्र साताहिकाच्या सिल्वर जुबली समारंभाच्या आयोजकांच्या विद्यमान वंशजांचा सत्यशोधका समाज संघातर्फे सन्मान चिन्ह देउन सत्‍कार करण्यात आला.

परिषदेचे सुत्रसंचालन प्रमोद पाटील यांनी केले तर प्रास्ताविक सुदर्शन जाधव यांनी केले व आप्पा जगताप यांनी आभार मानले. काशिनाथ महाजन यांनी प्रतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक कवनांचे गायन केले. सदरील सत्यशोधक परिषदेत खालील प्रकारे सहा ठराव मांडण्यात येऊन सर्वसंमतीने पारित करण्यात आले.

१) जाती व पोटजाती व्यतिरिक्त अन्य जातीत (अंतरजातीय) विवाह संबंध करण्यात यावेत.

२) शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा.

३) सत्यशोधया पद्धतीनुसार समाजाने सर्व विधी करावेत याचा प्रचार व प्रसार करण्यात यावा.

4) समाजातील अनिष्‍ठ असलेली विधवा प्रथा बंद करण्यात यावी.

५) ओबीसीसह सर्वजातींची जनगणना करण्यासाठी ग्रामपंचायतींनी ठराव पारित करून शासनास पाठविणे.

6) लग्‍न, साखरपुडा यासारखे विधी साध्या पद्धतीने करून त्‍यातील वाचलेला पैसा शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी वापरावा.

    उपरोक्त ठरावांचे वाचन राकेश मोरे यांनी केले. सत्यशोधक परिषद यशस्वी करण्यासाठी सुदर्शन जाधव, आप्पा जगताप, शंकर जाधव, भरत शेलार, राकेश मोरे, प्रशांत बागुल, दिगंबर जाधव, विनोद खैरनार, रमेश बच्‍छाव व मुंजवाडच्या ग्रामस्थांनी कमालीचे परिश्रम घेतले.

 

Satyashodhak, obc, Mahatma phule, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209