भाजपा ओबीसी महामेळाव्यात हंसराज अहीर यांचा आरोप
ओबीसी समाजात जनजागृती आवश्यक हंसराज अहीर यांचे प्रतिपादन
नागपूर, - ओबीसी समाजात जनजागृती होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. भाजपच्या ओबीसी मोर्चातर्फे महाल येथील शिक्षक सहकारी बँक सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. अहीर म्हणाले, मोदी सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीस सरकारने ओबीसी समाजाला न्याय देत 27 टक्के आरक्षण दिले. ओबीसी मंत्रालय स्थापन केले. न्यायालयात आरक्षण मान्यही करण्यात आले. मात्र, सरकार बदलताच काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी न्यायालयात धाव घेत आरक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. महाविकास आघाडीने सुप्रीम कोर्टात चांगला वकील उभा केला नाही. इंपेरीकल डाटाही सादर केला नाही. परिणामी, ओबीसींना राजकीय आरक्षणापासून वंचित राहावे लागले. मध्यप्रदेशच्या भाजप सरकारने मात्र 45 दिवसात डाटा सादर करीत ओबीसींचे आरक्षण वाचविले. प्रास्ताविक ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष रमेश चोपडे यांनी केले. माजी महापौर नंदा जिचकार, अविनाश ठाकरे, राजेश बांते आदींची भाषणे झाली.