भारताला खाद्य तेल पुरवठ्यात स्वावलंबी करणार - काशिराम वंजारी

ग्रामीण उद्योजगांची मुंबईत राज्य स्तरीय परिषद संपन्न

     मुंबई - देशात खाद्यतेले यांचा मोठा प्रमाणात तुटवडा भासत असून, भारता सारख्या बलशाली देशाला अद्याप ही खाद्य तेल आयात करावे लागते, हे आयात खाद्यतेल सुमार दर्जाचे असते व जनतेच्या आरोग्याला हानिकारक ही असते म्हणून भारताला खाद्य तेला बाबत स्वयंपूर्ण करण्याचा निर्धार ओबीसी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अँड अग्रिकल्चर ने केला असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ञ प्राध्यापक काशिराम वंजारी यांनी व्यक्त केला.

     ग्रामीण महाराष्ट्रातील नवं तेल खाद्य उत्पादकांची राज्य स्तरीय परिषद नुकतीच मुंबईतमध्ये पार पडली. या परिषदेला राज्याच्या ग्रामीण भागातील दोनशे प्रतिनिधी व नवं उद्योजग सहभागी झाले होते.

India will become self-sufficient in edible oil supplies    कृषी क्षेत्रातील ,प्रख्यात "अकोले पॅटर्न " ची स्थापना करण्यात आली असून ,लवकरच याचा शुभारंभ केंद्रीय कृषी मंत्री व राज्याचे कृषिमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. स्वयंपूर्ण शेतकरी व शेतकरी उद्योजग कसा बनवणार याचा हा ,"अकोले पॅटर्न" असून शेतकरी सभासद यांना दरमहा हमखास रक्कम या पॅटर्न अंतर्गत दिली जाणार आहे.

    देशात खाद्य तेल किती निकृष्ट दर्जाचे असते, तसेच ते आरोग्याला हानिकारक ही असते याचा शास्त्रीय आधार घेऊन , डॉक्टर मंडळीने आता खाद्य तेलाबाबत जन जागृती केली पाहिजे,असे ही काशीराम वंजारी म्हणाले.

     लाकडी तेल घाना उद्योग ग्रामीण भागात रोजगाराची मोठी संजीवनी असून , देशातील जनतेचे आरोग्य सुधार प्रकल्प ही चेंबर ने हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. हा उद्योगात सध्या सुमारे दोनशे करोड ची उलाढाल होत असून , एक हजार कोटींचे उद्दिष्ठ चेंबरने ठेवले आहे ,या करिता चेंबरची उप कंपनी आर एस के नॅचरल ही कंपनी बाजारात मार्केटिंग करत आहे.

    तेलबिया संशोधन व पुरवठा बाबत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी हमी दिली असून, विदर्भातील सुमारे २५०० हेक्टर वर भुईमूग लागवड केली जाणार आहे. मराठवाड्यात करडई ,सूर्यफूल लागवडी बाबत चर्चा सुरू झाली आहे. ३१ मार्च २०२३ अखेर राज्यात लाकडी तेल घाना प्रकल्पाचे २ हजार उद्योग उभे राहणार आहेत .राज्यातील ३५८ तालुक्यात ही क्रांती घडून आणली जाणार असून, बँका ही या प्रकल्पास मंजुरी देत आहेत. हा प्रकल्प उत्तर भारत, राजस्थान,केरळ या राज्यातही राबवला जाणार असून देशातील खाद्य तेलाची आयात कमी करून आत्मनिर्भर भारत बनवण्याचा प्रयत्न चेंबर मार्फत केला जाणार आहे.

     या वेळी जिल्हा परिषद धुळे चे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांचे ही मार्गदर्शन झाले. या परिषदेस चेंबरचे उप अध्यक्ष नारायणसिंग साबळे, वित्तीय सल्लागार तुषार पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुरुजित सिंग, मुख्य अर्थ व्यवस्थापक शर्मा, भूषण पाटील, मुसदर्द शेख , खांडेकर , श्रीमती गीता आदी हजर होते. इरफान कौशाली यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार नारायणसिंग साबळे यांनी व्यक्त केले.

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209