राष्ट्रसंत तुकडोजी विद्यापीठात राष्ट्रसंतांच्या साहित्य संशोधनाला विरोध ?

पण राष्ट्रसंत स्मृति संशोधन शिष्यवृत्ती भेटणार !

    24 मे 2022 नागपूरातील मोठ्या वर्तमाणपत्रांमधून एक जाहिरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची प्रसीद झाली. त्या जाहिरातीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रमृति संशोधन शिष्यवृत्ती विषयी माहीती प्रसीद्ध झाली. शैक्षणीक सत्र 2022-2023 या कालावधीत ज्यांनी विवीध विषयातील संशोधनासाठी विद्यापीठाकडेनोंदनीकेली तेच विद्यार्थीयाशिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतील. ही शिष्यवृत्ती जे विद्यार्थी याच विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले असेल त्यांनाच मीळेल. 8000/-रूदरमहा दोन वर्ष पर्यंत शिष्यवृत्ती भेटणार,

Opposition to Rashtrasant literary research at Rashtra sant Tukdoji University    एकीकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाचा जयजयकार करायचा त्यांच्या समाधीस्थळावर जाऊन श्रध्दा दाखवायची आणि दुसरीकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यावर संशोधन करणा-या विद्यारथ्याच्या विषयालानाकारत, राष्ट्रसंतांच्या साहित्यावर भरपूर संशोधन झाले आता त्याची गरज नाही. असा लेखी शेरा मारायचा.

    विद्यापीठातील हे कोण शुक्राचार्य ज्यांचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्यासाहित्यावर परीपूर्ण अभ्यास झाला आहे. त्यांची नावे कुलगुरूंनी जाहिर करावी अभ्यासक त्यांच्या विद्वतेचा लाभ घेतील.

    विद्यापीठ नामकरणाआधी याच विद्यापीठाने राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेचे दोन अध्याय जे एम.ए. मराठीला ऑपशन होते तेही अभ्यासक्रमातून वगळले होते. काही साहित्तीकांचे विचार शाळेपासून तर महाविद्यालयापर्यंत शीकतो त्यांच्या साहित्यावर विद्यार्थी सातत्याने संशोधन करतात, ते संशोधन थांबत नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्या विषयीच दुजाभावका केला जातो ? याचे उत्तर विद्यारथ्यांना मीळणार का?

    सर्वजाती-धर्म-पंच-संप्रदाय-विवीधभाषाविविध संस्कृती भारतात असून भारत आपली लोकशाही सत्तर वर्षापेक्षा जास्त काळापासून सांभाळून आहे. भारताच्या स्वातंत्र्याला पंच्यात्तर वर्ष होत आहे. त्यात संतसाहित्याचे योगदान मोठे आहे, हे आपण नाकारणार का? संताचे साहित्य विचार हे घराघरात लोकमणावर राज्य करतात त्यातून समाजमन घडत, बंधूभाव - मैत्रीभाव आजही भारताला एकसंघ ' ठेऊन आहे. साहित्तीकांच साहित्य शाळा महाविद्यालयापर्यंत शीकवील्या जाते ते जनमाणसात पोहचत का? विद्यारर्थ्यांना संत साहित्य त्यांच्या जीवनासाठी उपयुक्त आहे. आज सर्व दूर तरूण नैराष्यात आहे. संत साहित्य त्याला जगण्याची हीम्मत देऊ शकते. आज आपल्या विद्यापीठाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत आहे. विद्यापीठ नामकरणाने आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी शब्दबध्द केलेल्या विद्यापीठगीत या भारतात बंधुभाव नित्य वसू दे.... ! याने विद्यापीठाचा सन्मान वाढवला, तुमच्याच विद्यापीठाच्या दिक्षांत समारोहात मान्यवर बोलून जातात याचा स्वाभिमान कोणाला आहे ? राष्ट्रसंत तुकडोजीमहाराजनागपूर विद्यापीठातीलकुलगुरू, सीनेटसदस्य, विचारवंत यांनी चिंतन कराव. जर संत साहित्य कुचकामी असेल तर नागपूर आणि अमरावती विद्यापीठाचे नामकरण पूर्ववत करूण घ्यावे. संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव महत्वाचे की विचार ?

- ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक,

सदस्य राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा अभ्यास मंडळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर, 9823966282

 

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209