कोल्हापुर - संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज छत्रपती संभाजी राजे जयंती निमित्ताने मेन राजाराम हायस्कुल येथे छत्रपती संभाजी राजे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आला.
गेल्या काही दिवसामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी भोंगा लावून लावून प्रयत्न चालू आहे परंतु गेल्या कित्येक दशकांपासून संभाजी ब्रिगेडने दंगली घडवणाऱ्या चे प्रयत्न हाणून पाडले आहेत कोल्हापूर मध्ये देखील आज मेन राजाराम हायस्कूल वाचवा यासाठी शिक्षणाचा भोंगा लावण्यात आला.
त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड पदाधिकारी व मेन राजाराम हायस्कूल शिक्षक यांनी मिळून घोडा गाडी व रिक्षा गाडीवर भोंगा लावून मेन राजाराम हायस्कूल विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी प्रबोधनात्मक रॅली देखील काढण्यात आले त्याच बरोबर भोई गल्ली ,रविवार पेठ अकबर मोहल्ला येथे जाऊन घरोघरी विद्यार्थी वाढी साठी प्रयत्न केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील भगवान कोइंगडे, निलेश सुतार, संदीप यादव राहुल पाटील योगेश जगदाळे, शाहबाज शेख, किरण गवंडी, आसिफ स्वार, संभाजी पाटील, अमरसिंह पाटील, अरुण जकाते, संताजी घोरपडे मदन परीट यांच्या सहकार्याने मुख्याध्यापक सागर नाईक व शिक्षक उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, dr Babasaheb Ambedkar, Bahujan