चाळीसगाव - १९ मे रोजी चाळीसगाव भारतीय जनता पार्टी च्या वतीने महाविकास आघाडी सरकार चा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ओबीसींच्या विविध मागण्यांचे निवेदन यावेळी नायब तहसीलदार धनराळे यांना देण्यात येऊन आंदोलन स्थगित केले गेले. यावेळी शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करुन परिसर दणआणून सोडण्यात आला. आमदार मंगेश चव्हाण यांनी आदोलनाचे नेतृत्व करत, ओबीसीबाबत शासनाच्या चुकीच्या धोरणाचा जाहिर निषेध केला.सदर आंदोलनात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश व जिल्हा पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, आजी माजी नगरसेवक, गटनेते, विविध आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
ओबीसी आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले आहे. शेजारच्या राज्य मध्यप्रदेशात आरक्षण मिळते. परंतु आपल्या राज्यात ओबीसी आरक्षणासंदर्भातील चुकीच्या धोरणामुळे आरक्षण गेले आहे. आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या आयोगाला सरकार पैसे देवू शकले नाही, असा घणाघात राज्यशासनावर आमदार मंगेश चव्हाण यांनी केला.
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देण्यात आलेल्या नागरीकांच्या प्रवर्गाच्या ( ओबीसी ) आरक्षणाला सर्वो च्च न्यायालयाने राज्यातील महाविकास आघाडीच्या हलगर्जीपणामुळे इंपिरिकल डेटा व तीन कसोटया यांचे पालन न केल्याने स्थगिती दिलेली आहे. मात्र अशीच परिस्थिती असणाऱ्या मध्य प्रदेश राज्याने मात्र वेळीच मागासवर्गीय आयोग नेमून आवश्यक तो डेटा सादर केल्याने सर्वोच्च न्यायालयात तेथील ओबीसी आरक्षणावरील स्थगिती उठविली आहे. मध्यप्रदेश सरकार हे करू शकते तर महाराष्ट्र का नाही ? महाराष्ट्र मध्ये मतदार याद्या नाहीत का ? का मतदार याद्यांनिहाय सर्वेक्षण करण्याची यंत्रणा नाही ? का हे सगळे करून आरक्षण देण्याची सरकार ची इच्छा नाही ? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झालाअसल्याची टीका विविध वक्त्यांनी आपल्या मनोगतात केली.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan