वाशिम : या अगोदर लग्रसमारंभात शिवरायांनच पुजन करून लग्नविधिला सुरुवात व्हायची परंतु यावषी ग्रामीण भागात आरती प्रथा सुरू करण्यात आली आहे.ज्या शिवराय हे एक सामान्य पुरुषच होते.परंतु कतृत्व,मेहनत,कष्ट, या जोरावर सामान्य माणूस हा असामान्य उंचीवर जाऊ शकतो हे शिवरायांनकडून शिकुन इथल्या तरुणांना प्रेरणा मिळावी. आज आपण आरती करत आहोत उद्या नैवैद्य दाखवु परवा नवस करु, आणि एकदा देव केलं की,त्यांच कतृत्व संपवुन टाकु, प्रबोधनकार ठाकरे एके ठिकाणी लिहतात की, छ. शिवाजी महाराज या नावात इतकी ताकद आहे की, जय शिवराय म्हटल की,तेहतीस कोटी देवांची फलटण बाद होते, म्हणुन देव देवांच्या जागेवर परंतु शिवरायांना त्या रांगेत बसवु नये असे आव्हान शिव व्याख्याते शंकर भारती यांनी केले.
लग्नसमारंभात जिजाऊ वंदना घ्यावी, पुजन घ्याव, आणि तरुणांना प्रेरणा मिळण्यासाठी पोवाडे लावावेत परंतु आपणच आपल्या महापुरुषांची उंची कमी करु नये असे आवाहन शिवव्याख्याते शंकर भारती यांनी केले.