समतानायक महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव तथा सत्कार समारंभ अकोट येथे उत्साहात संपन्न !

   अकोट - बसव विचार समिती तथा शिक्षक आघाडी प्राथमिक विभाग तथा शिक्षक मित्र परिवार अकोटच्या वतीने लिंगायत धर्म संस्थापक , लोकशाहीचे जनक, समतानायक, जगतज्योती महात्मा बसवेधर यांच्या ९१७ व्या जयंतीचे तथा सत्कार समारंभाचे आयोजन  दि . ०८/०५/२०२२ रोजी श्री. स्वामी विवेकानंद इंग्लीश स्कुल अकोट च्या सभागृहात करण्यात आले होते.

   कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ सामाजिक कार्यकर्तेअतणआप्पासंगोदकर हेहोते तर प्रमुख अतिथी म्हणून सुशआप्पा दरेकर शाखा अभियंता पाणीपुरवठा जि. प. अकोला. संदिपजी मालवे गटशिक्षणाधिकारी अकोट,सौ. संध्याताई वाघोडे माजी जि. प. अध्यक्षा, सुनिल वसू मुख्याध्यापक स्वामी विवेकानंद इंग्लीश स्कुल हे होते. सर्वप्रथम समतानायक महात्मा बसवेश्वर यांच्या मुर्तीपुजनाने तथा दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत भेटवस्तू देऊन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले.

Samta Nayak Mahatma basweshwar Jayanti Utsav Akot    कार्यक्रमाचे आयोजक मंगेश वसोडे यांनी महात्मा बसवेश्वर यांचे विचार तथा आयोजना मागील भुमिका आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केली. त्यानंतर विविध क्षेत्रात भरीय उलेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार बसव विचार समितीच्या वतीने करण्यात आला . यामध्ये सौ.दिपाली संतोषआप्पा मोदे, उपसरपंच एदलापूर, कु. सविता देविदास गोरे (सौ. आरेवार), मु. अ. जि. प. शाळा लोतखेड, योगेश आप्पा बिडवे तेल्हारा, सेवा सह सोसायटीवर निवड, सौ. सपनाताई अजयआप्पा धाके, ग्रां. प. सदस्य अडगाव बु., कु. शुभांगी फु ले (सा. आकोट कार), आरोग्यसेविका अकोली जहा रामदास पंधरे, सहा शिक्षक जि. प. शाळा रुईखेड, शाम पाठक, शि. पं. स. तेल्हारा, चंद्रशेखर अशोक महाजन, स. शि. जि. प. शाळा कोठा बु., उमेश चोरे, मु. अ. जि. प. शाळा बोर्डी, निलेश काळे, संचालक शिक्षक सह. पतसंस्था, अनिल सावरकर, संचालक शिक्षक सह. पतसंस्था या सर्वांचा सन्मानचिन्ह तथा पुष्पगुच्छ प्रदान करूण यथोचित सन्मान बसव विचार समितीच्या वतीने करण्यात आला. यानंतर चि. रुद्र मंगेश दसोडे यांच्या समता गीतांनी कार्यक्रमामध्ये रंगत आली. त्यानंतर प्रमुख पाहुणे संदिप मालवे तसेच सौ. संध्याताई वाघोडे यांनी आपल्या मनोगतातून महात्मा बसवेसर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. सत्काराला उत्तर म्हणून चंद्रशेखर अ.महाजन, उमेश चोरे, सौ. शुभांगी आकोटकार (कु. फुसे) यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

    तसेच महात्मा बसवेश्वर यांच्याविषयी विस्तृतपणे माहिती कु. भाग्यश्री मंगेश दसोडे हिने आपल्या अमोच वाणीतून विषद केली. अरुणजी सांगळोदकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगताद्वारे संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेत समतानायक महात्मा बसवेरांचे चिरंतन विचार कायम समाजाला दिशादायक आहेत व ठरतील ह्या भावना व्यक्त केल्या.

    कार्यक्रमाचे सुत्र संचालन महेंद काकड तर आभार विष्णू झामरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता. बसवविचार समिती व शिक्षक आघाडी प्राथमिक विभाग अकोटयांनी प्रयत्न केले.

 

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209