नुकतेच महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभाग अध्यक्ष डॉ. सतीश वैरागी यांचा ओबीसी जनजागृती व प्रसार मागणी साठी कोकण दौरा आयोजीत करण्यात आला होता. या दौऱ्यात डॉ. सतीश वैरागी यांनी तेली समाजाला सामाजिक,आर्थिक व सांस्कृतिक जागृत करण्याकरिता ओबीसी चळवळ म्हणून एक तत्वज्ञान निर्माण करणे, ओबीसी उद्दिष्ट्य व पर्यायी सांस्कृतिक राजकारण आणि सोबतच पर्यायी साहित्य, कला, शिक्षण यावर बहमुल्य मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात कोकणातील सर्व संस्थांनी डॉ. सतिश वैरागी व त्यांच्या पत्नी या कुटुंबियांचे यांचे आदरपूर्वक पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, आभारही मानले. या दौऱ्यात चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, गणपतीपुळे, देवगड, राजापूर, कुणकेश्वर येथे सभा घेऊन त्यांनी ओबीसीचे महत्व पटवुन सांगितले. तसेच आरक्षणाचा हक्क रद्द केला गेला तर पुढील पिढी आपणास माफ करणार नाही असेही निक्षुण सांगितले. शिक्षण, करियर, व्यवसाय, बेरोजगार यावर तैलिक संघटनेकडून योग्य मार्गदर्शन मिळावे या करीता कोकणातील संस्थानी मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan