तिसरे फुले - शाहू - आंबेडकर ओबीसी महिला साहित्य संमेलन

स्मृतिशेष डॉ. अ‍ॅड. एकनाथराव साळवे साहित्य नगरी,चंद्रपूर येथे तिसरे फुले-शाहू-आंबेडकर ओबीसी महिला साहित्य संमेलन

उद्धघाटक डॉलक्ष्मण यादव आणि "जयंती" चित्रपट दिग्दर्शक शैलेश नरवाडे,अभिनेता ऋतराज यांची उपस्थिती

     चंद्रपूर :- फुले शाहू आंबेडकर महिला साहित्य व संस्कृती संवर्धन समिती, नागपूर व्दारे रविवार दि.८ मे २०२२ रोजी स्मृतिशेष डॉ. अँड एकनाथराव साळवे साहित्य नगरी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मवीर कन्नमवार सभागृह, नागपूर रोड, चंद्रपूर येथे सकाळी ९ वाजता आयोजित तिस-या फुले, शाह, आंबेडकर ओबीसी महिला साहित्य संमेलनाचे उद्घाटन जेष्ठ ओबीसी विचारवंत आणि नवी दिल्ली येथील जाकीर हुसेन कॉलेजचे डॉ. लक्ष्मण यादव यांच्या हस्ते होणार असुन प्रसिद्ध मराठी चित्रपट 'जयंती'चे दिग्दर्शक शैलेश नरवाडे व अभिनेता ऋतुराज यांचे उपस्थितीत समारोप होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुणा सबाने आणि स्वागताध्यक्षपदी अँड डॉ अंजनी साळवे विटनकर यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.

    महात्मा जोतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनशील विचाराने प्रेरीत साहित्यरूपाने अभिव्यक्त होण्यासाठी व नव्या दृष्टीने उभे राहण्यासाठीच २५ व २६ डिसेंबर, २०१९ ला ओबीसी महिलांचे नवविचारांचे फुले, शाह, आंबेडकर पहिले साहित्य संमेलनाचा पाया नागपूर येथे रचला गेला. कोविड- १९ च्या वातावरणामुळे डिसेंबर २०२० मध्ये दुसरे साहित्य संमेलन ऑनलाईन घेण्यात आले होते.

Third phule shahu ambedkar OBC Mahila Sahitya Sammelan   चंद्रपुर येथे होत असलेल्या तिसर्या फुले,शाहू, आंबेडकर ओबीसी महिला साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्राला माजी संमेलनाध्यक्ष यझाडीबोली कवयित्री अंजनाबाई खुणे, बहुजन संघटकचे संचालक राहुल खांडेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, युवा नेत्या शिवानी वडेदीवार, ज्येष्ठ समाजसेवक प्रभाताई वासाडे हे विशेष अतिथी म्हणुन उपस्थिती राहतील तसेच दैनिक बहुजन सौरभचे मुख्य संपादक मिलिंद फुलझेले, श्री गुरुदेव युवा मंचचे मुख्य प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक आदी मान्यरांची प्रमुख उपस्थिती राहील.

   संमेलनाच्या दुस-या सत्रात दुपारी १ वाजता डॉ लीना निकम यांच्या अध्यक्षतेत होणा-या परिसंवादात हाकर्मकांड निर्मूलनात महिलांची भूमिका' या विषयावर डॉ. लोना निकम, ' सुधारणावादी व परिवर्तनशील साहित्यात महिलांची भूमिका व सहभाग' या विषयावर सुनिता काळे, प्रसारमाध्यमात महिलांचा सहभाग या विपयावर अर्चना गाडेकर आणि सामाजिक परिवर्तनात साहित्याची भूमिका या विषयावर प्रा. जावेद पाशा है प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन करतील, यावेळी अँड. दत्ता हजारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. या सत्राचे सुत्रसंचालन एकता बंडावार तर आभार प्रदर्शन प्रणीती कळमकर या करतील.

   संमेलनाच्या तिस-या सत्रात दुपारी ३ वाजता 'काव्य मशाली' या कवी संमेलनाचे आयोजन रखमाला भोयर यांच्या अन्यावेत करण्यात येणार असून त्यास प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध गझलकार चित्रा कहाते उपस्थित राहतील, या सत्राचे संयोजन निशा खापरे तर सूत्रसंचालन गीता देव्हारे रायपुरे व आभार प्रदर्शन गीता वाळके या करतील. सम्मेलनाचे सामारोपिय सत्रात संमेलनाध्यक्ष अरुणा सबाने यांचेसमवेत सामाजिक विचारवंत व सदस्य सचिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र व साधने प्रकाशन समिती मुंबईचे डॉ प्रदीप आगलावे आणि अँड डॉ. सविता बेदरकर आदी मान्यवर तर विशेष उपस्थिती म्हणून दैनिक बहुजन सौरभचे प्रबंध संपादक अँड डॉ सिद्धार्थ कांबळे, ग्रामगीताचार्य व केंद्रीय सदस्य झाडीबोली साहित्य मंडळ बंडोपंत बोडेकर. जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्रच्या उपाध्यक्षा सुनिता जिचकार, जेष्ठ रंगकर्मी जयश्री कापसे गावंडे प्रामुख्याने उपस्थित असतील, यावेळी फिनिक्स पुरस्कार वितरण आणि सुप्रसिद्ध मराठी चित्रपट जयंती चे दिग्दर्शक शैलेश नरवाडे आणि चित्रपट अभिनेता ऋतुराज यांचा विशेष सत्कार करण्यात येईल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. माधुरी गायधनी दुपटे आणि प्रीती जगाप तर आभार प्रदर्शन प्राचार्य संध्या राजूरकर या करतील.

    ओबीसी महिलांचे सांस्कृतिक, साहित्यिक, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय वास्तव या संदर्भात तिची भूमिका, भविष्यातील वाटचाल यावर सतत मंथन होणे गरजेचे असल्याने पुन्हा एकदा फुले, शाह, आंबेडकर यांच्या परिवर्तनशील विचाराने प्रेरित या संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे.

    हे संमेलन म्हणजे ओबीसी महिलांचे वैचारिक क्रांतिकारक पाऊल असल्याचे फुले शाहू आंबेडकर महिला साहित्य व संस्कृती संवर्धन समितीच्या मुख्य प्रवर्तक प्रा. संध्या राजूरकर आणि संयोजक प्रा. माधुरी गायधनी, डॉ बीणा राऊत माधुरी लोखंडे यांनी कळविले असुन या ऐतिहासिक संमेलनाचे साक्षीदार होण्यासाठी सवानों उपस्थित रहावे असे आवाहन संमेलनाध्यक्ष अरुणा सबाने आणि स्वागताध्यक्ष डॉ अँड अंजली साळवे विटनकर यांनी केले आहे.

 

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209