अहमदनगर- राजर्षी शाहू महाराजांनी रयतेच्या उन्नतीसाठी सर्वाधिक खर्च शिक्षणावर केला. ते म्हणत रयतेच्या कल्याणासाठी माझा खजिना जरी रिकामा झाला तरी चालेल पण माझी रयत पुढे गेली पाहिजे. त्यांना शिक्षणाचे महत्त्व माहीत होते. आजचे आपले सरकार शाळा परवडत नाहीत म्हणून बंद करायला निघाले आहे. ही बाब राजर्षी शाहूंच्या विचारविरोधी त्यांच्या वसा वारशाला बट्टा लावणारी आहे. आपल्या शासनीने राजर्षी शाहंचा आदर्श ठेवत, वारसा जपत मोफत शिक्षणावर भर द्यावा, अर्थसंकल्पात तशी भरीव तरतूद करावी, असे प्रतिपादन कृषी व समाज अभ्यासक आनंद शितोळे यांनी केले.
राजर्षी शाहू महाराज स्मृतिशताब्दी समितीच्या वतीने चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे नुकतेच ईद मीलन आणि परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी श्री. शितोळे बोलत होते. राजर्षी शाहू महाराजांचे कार्य विषयावर संवादकांनी आपली मते मांडली. यावेळी घर घर लंगर सेवा या उपक्रमाचे हरजीतसिंह वधवा म्हणाले की, राजर्षी शाह महाराजांच्या सामाजिक एकोप्याचा वारसा आपल्या सर्वांना एकजूटीने पुढे न्यायचा आहे. सोनाली देवढे-शिंदे म्हणाल्या की, सुमारे १०० वर्षांपूर्वी महिलांच्या विकासासाठी राजर्षी शाहूंनी केलेले कार्य आजही पथदर्शी आहे. सुधीर लंके म्हणाले की मीडिया या चौथ्या खांबाचीही चिकित्सा झाली पाहिजे. डीवायएसपी अनिल कातकडे म्हणाले की, शाहू महाराजांनी समतेचा व एकोप्याचा विचार दिला. युनूसभाई तांबटकर व भैरवनाथ वाकळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास आरपीआयचे अशोक गायकवाड, माजी समाजकल्याण अधिकारी रफिक मुन्शी, न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य एम. एम. तांबे, सुजाता पाशुलबुधे, प्रा. डॉ. बाळासाहेब पवार, तोफखाना पोलिस ठाण्याच्या ज्योती गडकरी, कोतवाली ठाण्याचे संपत शिंदे, रेव्हरंड जनार्दन वाघमारे, महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते विनित पाऊलबुधे, शाकिर शेख, प्राचार्य डॉ. प्रशांत शिंदे, नगरसेवक असिफ सुलतान, राष्ट्रवादीचे संजय सपकाळ, उबेद शेख, अॅड. शिवाजी डमाळे, अरुण खिची, अशोक सब्बन, बाळासाहेब मिसाळ, पांडुळे मामा, बबलू सय्यद, प्राचार्य खासेराव शितोळे, प्रकाशमामा साळवे, भाऊसाहेब थोटे, एजाज खान, दीपक वर्मा, दत्ता वामन, रावसाहेब काळे, अनिस इंजिनिअर, शफी जहागीरदार आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जीवन सुरुडे, दत्ताभाऊ वडवणीकर, तारीक शेख, नादीरखान नूरखान, आबिद खान, महादेव भोसले, राजू नन्नवरे, आसाराम भगत यांनी परिश्रम घेतले. पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. महेबूब सय्यद यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. बापू चंदनशिवे यांनी केले. अहमदनगर हॉकर्स संघटनाध्यक्ष त संजय झिंजे यांनी आभार मानले.