राज्यातील लिंगायत समाजाची सरसकट ओबीसी आरक्षणाची मागणी.

सकल लिंगायत महासमितीची स्थापना राज्यातील लिंगायत संघटनाचा ऐक्याचा एल्गार..!

     पुणे :- महाराष्ट्रातील प्रमुख लिंगायत संघटना एकत्र करून सकल लिंगायत महासमितीची स्थापना करण्यात आली आहे. समाजाच्या प्रमुख मागण्या आणि प्रश्नांसाठी लिंगायत समाजाच्या प्रमुखांनी ऐक्याचा एकमुखी एल्गार पुकारला आहे.

     महाराष्ट्रातील लिंगायत संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व्यापक बैठक लिंगातय समाज संघर्ष समितीचे मुख्य समन्वय काकासाहेब कोयटे यांच्या पुढाकारातून पुणे येथे आयोजित करण्यात आली होती.यावेळी लिंगायत समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनिल रूकारी,कार्याध्यक्षा सरलाताई पाटील,लिंगायत महासमितीचे अध्यक्ष सुदर्शन बिरादार, लिंगायत सेवा संघाचे अध्यक्ष विजय शेटे, महाराष्ट्र बसव परिषदेचे अध्यक्ष शिवानंद हैबतपुरे, राष्ट्रसंत मिशनचे अध्यक्ष रामदास पाटील, महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचे अध्यक्ष डॉ.बसवराज बगले, काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र व्यवहारे, भाजपाचे प्रवक्ते प्रेरणा होनराव, मनसेचे संतोष जिरेसाल, शिवसेनेचे ज्ञानेश्वर खर्डे, राष्ट्रवादीचे संजय चितारी, आम आदमी पक्षाचे नरेंद्र देसाई, सौ. सुहासिनीताई कोयटे, उपाध्यक्ष राजेंद्र मुंडे, भगवान कोठावळे, मराठवाडा प्रमुख उदय चौंडे, संघटक गुरूनाथ बडूरे, युवा अध्यक्ष प्रदीप साखरे, शिवलिंग ढवळेश्वर, अनिल चौगुले, ज्ञानेश्वर खर्डे, चंद्रशेखर दणदणे, निशाताई बिडवे, भगवान कोठावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्यस्तरीय किमान समान कार्यक्रम

obc aarakshan for all lingayat Samaj in maharashtra     राज्यातील लिंगायत समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण तात्काळ मिळावे, मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी ५०० कोटी रूपयांची तरतूद व्हावी, महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून त्यासाठी ५०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, श्रीक्षेत्र कपिलधारच्या विकासासाठी तात्काळ निधी मिळावा. लिंगायत विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची स्थापना करण्यात यावी, गाव तिथे स्मशान भूमीसाठी जागा व सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, असे ठराव मांडण्यात आले ते टाळ्यांच्या गजरात एकमताने मंजूर झाले.या सर्व विषयांचा किमान समान कार्यक्रम ठरविण्यात आला.

राज्यस्तरीय समन्वय समिती

     ओमप्रकाश तथा काकासाहेब कोयटे यांच्या नेतृत्वाखाली समाज प्रमुखांची एक राज्यस्तरीय समन्वय समिती यावेळी गठीत करण्यात आली.यामध्ये सर्वश्री काकासाहेब कोयटे ( कोपरगाव ) सुनिल रूकारी ( पुणे ) सरलाताई पाटील ( कोल्हापूर ) प्रा.सुदर्शन बिरादार ( लातूर ) विजयकुमार शेटे ( लातूर ) बसवराज कणजे ( चिंचवड ) शिवानंद हैबतपूरे ( लातूर ) रामदास पाटील ( नांदेड ) डॉ.बसवराज बगले ( सोलापूर ) प्रेरणाताई होनराव ( लातूर ) अनिल चौगुले ( नासिक ) आदींचा समावेश करण्यात आला आहे.किमान समान कार्यक्रमाचे धोरण ठरवून प्रत्येक जिल्ह्यात आणि शासनस्तरावर त्याची अंमलबजावणी करण्याचे काम या राज्यस्तरीय समन्वय समितीकडून करण्यात येणार आहे.

    या बैठकीला केशवराव नगरे, जयश्री तोडकर, उज्ज्वला बसवे, संतोष लिभारे, अर्चना खडके, शिवा खांडकुळे, दत्तात्रय वायचळ, शिवानंद कथले,सतीश नीलकंठ, राजेश कोठाळे, अरूण आवटे, सुधीर भुसारे, गिरीश सोनेकर, अनिल रुद्रके, लक्ष्मी घोडके, श्रीकांत तोडकर, नंदकुमार गवंडर, निंगप्पा तळे, तुषार स्वामी, प्रा.मुचाटे, बसवराज हिरेमठ, यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

 

Satyashodhak, obc, Mahatma phule, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर

Top News

mahajyoti for Other Backward class Students
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी  मोफत ऑनलाईन प्रशिक्षण, टॅब, दररोजचा सहा जीबी इंटरनेट डेटा - महाज्योती - महाराष्ट्र शासन स्वायत्त संस्था
Sutara.jpg
सुतार समाजाला ब्राह्मणांमध्ये स्थान द्या आरक्षण रद्द करून खुल्या प्रवर्गात घ्या ?
Maratha aarakshan Reservation - Truth and Politics
मराठा आरक्षण: सत्य आणि राजकारण
No Reservation In Jobs After Privatisation Of Govt PSUs
निजीकरण के बाद आरक्षण का लाभ नहीं
Deshbhakt Keshavrao Jedhe great leader of satyashodhak Movement After Mahatma Phule Hari Narke
देशभक्त केशवराव जेधे हे महात्मा फुलेंनंतर सत्यशोधक चळवळीतील सर्वात मोठे लोकनेते होते - प्रा. हरी नरके
Condemnation of Manoj Jarange who made baseless statement about OBC leaders
ओबीसी नेत्यांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या मनोज जरांगेचा निषेध
Tailik Mahasabha Konkan Vibhag OBC janajagruti Konkan Daura
तैलिक महासभा कोकण विभाग अध्यक्ष डॉ.सतीश वैरागी यांचा ओबीसी जनजागृतीपर कोकण दौरा
Mali Teli OBC badnami - Professor Hari Narke
माळी, तेली, ओबीसींची बदनामी - फॅसिस्टांकडून गोबेल्सनितीचा वापर - प्रा. हरी नरके
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209