घनसावंगी - जालना येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची जिल्हा आढावा बैठक समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. सुभाष राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी राष्ट्रीय सचिव रवी सोनवणे, जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे, प्रदेश प्रवक्ते प्रा.संतोष वीरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अॅड.सुभाष राऊत यांनी गाव तिथे समता परिषद घर तेथे समता सैनिक अशी संकल्पना राबवून सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमेकाशी समन्वय साधण्याचे आवाहन केले व लवकरच तालुका निहाय समता परिषदेचे आढावे घेण्यात येणार असल्याचेही सूतोवाच सुद्धा राऊत यांनी केले तर जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांनी पदाधिकाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवून बळ देण्यासाठी भुजबळ यांच्याकडे मागणी करावी व तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी ओबीसी समाज बांधवांनी एकवटून भुजबळ यांना बळ देण्याची अत्यंत गरज असून त्यासाठी समता परिषदेने रस्त्यावरील लढाई ताकतीने लढवावी असेही बोलताना नमूद केले. यावेळी वंजारी सेवा संघ युवक जिल्हाध्यक्ष विक्रम वराडे, सौ. गंगुताई वानखेडे, युवक जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल धानुरे, सौ. मंगलताई खांडेभराड,प्रहारचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुकुंद खरात, शहराध्यक्ष दीपक वैद्य, सुधाकर घेर, राधाकिसन माने, राजेंद्र दारुंटे, सुंदरराव कुदळे, शिवाजी गाडेकर, दशरथ तोंडूळे, त्रिंबक हजारे, रवींद्र उखरडे, बद्रीनाथ गाढवे, विलास शिंदे, सुनील बनकर, रंगनाथ उकांडे, गोरख हिरे, ज्ञानेश्वर खरात, मधूकर झरेकर, चंद्रहास लाड, प्रा.जगन्नाथ रासवे, बालाजी गाढवे, राजकुमार बुलबुले, शिवानंद खरात, रघुवीर गुढे, नंदकिशोर जाधव, रावसाहेब वाघमारे, पांडूरंग शिंदे, गणेश वाघमारे, दगडू बडदे, बाबासाहेब वानखेडे, राजू इंगळे, विकास शिंगणे, श्रीराम निकरट, बाबासाहेब कोरडे, शंकर सातपुते, विजय साखरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व समता परिषदेचे पदाधिकारी, समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule, Bahujan