घनसावंगी - अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारणीत नुकतेच फेरबदल करण्यात आले असून राज्यभरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने आढावा बैठका घेण्यात येत आहेत. त्या निमित्ताने जालना येथील शासकीय विश्रामग्रह (४८८) येथे शुक्रवार (ता. २९) दुपारी चार वाजता आढावा बैठक घेण्यात येणार आहे.
राज्यात दि. २५ व ३० एप्रिल दरम्यान समता परिषदेचे संस्थापक ना. छगनरावजी भुजबळ, खा. समीर भुजबळ, आ. पंकज भुजबळ, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ यांच्या आदेशावरून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. सुभाष राऊत यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यात विविध ठिकाणी आढावा बैठका घेण्यात येणार आहेत. यावेळी प्रदेश सचिव रवी सोनवणे, प्रदेश प्रचारक प्रा.संतोष विरकर यांची उपस्थिती राहणार आहे.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या मराठवाड्यात सहा दिवसीय दौरा आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रदेश उपाध्यक्ष अॅड. सुभाष राऊत, प्रदेश सचिव रवी सोनवणे, प्रदेश प्रचारक संतोष विरकर, प्रदेश प्रचारक डॉ. नागेश गवळी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला समता परीषदेचे जिल्हा उपाध्यक्ष, सर्व तालुका अध्यक्ष, तालुकाकार्याध्यक्ष, शहर अध्यक्ष, महीला जिल्हा अध्यक्ष व सर्व पदाधीकारी व समता सैनिक यांनी उपस्थीत राहावे, असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे, युवक जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल धानुरे, शहराध्यक्ष दीपक वैद्य यांनी केले आहे.
Satyashodhak, obc, Mahatma phule, Bahujan