पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त लोहगाव येथील मराठवाडा मित्र मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात 'वर्ल्ड नॉलेज डे' साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चित्रफित दाखविण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. रूपेश भोरटक्के यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विभागप्रमुख प्रा. आर. एस. पाटील. प्रा. डॉ. उमेश मोहरील, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच या वेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. मेघना यशवंते यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रशांत लिहितकर यांनी प्रास्ताविक केले. तसेच ग्रंथपाल रिना कोकणे यांनी आभार मानले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan