क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त सोमवार दिनांक ११ एप्रिल २०२२ रोजी फुलेनगर जत येथे विविध कार्यक्रमाचे आयोजित करून करण्यात आली. या कार्यक्रमास अखिल भारतीय महाराष्ट्र माळी महासंघाचे संस्थापक शंकरराव लिंगे हे अध्यक्ष पुरोगामी विचावंत विश्वगुरू बसवण्णा यांचे गाडेअभ्यासक चन्नवीर भद्रेश्वरमठ हे प्रमुख वक्ते तर आप्पासाहेबपवार उपनगराध्यक्ष, संजय कांबळे सांगली जिल्हा आरपीआय अध्यक्ष हे प्रमुख पाहुणे उपस्थिती होते.
सोमवार दि.११ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता महात्मा फुलेनगर अचकनहळी रोड शासकीय गोदामाजवळ जि.प.गावडेवस्ती शाळे शेजारी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, विश्वगुरु बसवण्णा, शाहु महाराज, राज्यमाता अहिल्याबाई होळकर, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सामुदायिक पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.. यानंतर विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार, पुरस्कार महात्मा फुले यांचा शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ व गुलाब पुष्प देऊन सोहळा संपन्न झाला . तरी या कार्यक्रमास शहर व तालुक्यातील फुले प्रेमी तुकाराम माळी,रमेश ऊर्फ चिकू माळी, उपनगराध्यक्ष आप्पा पवार, विक्रम ढोणे ,सुजता माळी,रविंद्र सोलनकर, अनिल मिसाळ, तायाप्पा वाघमोडे, दिपक हत्ती, भैराप्पा माळी,माजी जत ग्राम पंचायत सदस्य नामदेव माळी,दत्ता माळी ,शिक्षक नेते दयानंद मोरे आदी उपस्थित होते.
महात्मा फुले जयंती उत्सव मंडळ व फुले प्रेमी मंडळ, जत तालुका ओबीसी संघटना यांच्या वतीने जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आली.
Satyashodhak, obc, Mahatma phule, Bahujan