नगर - सावित्रीबाई फुले यांनी बिकट परिस्थितीत हालअपेष्टा सहन करून आणि समाजाचा विरोध पत्करुन शिक्षण घेतले. एका बिकट क्षणी समाज विरोध असह्य होत असताना महात्मा जोतीबा फुले हे खंबीरपणे सावित्रीबाई फुले यांच्या पाठीशी उभे राहिले. सावित्रीबाई व महात्मा जोतीबा फुलेंच्या या अथक प्रयत्नामुळेच आज स्त्री साक्षर, सक्षम आहे, असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. स्वाती मुनोत यांनी केले. येथील के.जी. कला व वाणिज्य महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी प्राचार्य डॉ. मुनोत बोलत होत्या. या प्रसंगी प्रा.वर्षा कीर्तने, प्रा. स्नेहल बोरावके, अमृता मुळे यांनी आपले विचार मांडले, कार्यक्रमाला संतोष मुनोत, हर्षाली रासकर, मनोज म्हहंकाळे, सविता केदारे विद्यार्थी व पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सविता चव्हाण यांनी, तर आभार प्रा. आनंद त्रिपाठी यांनी मानले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar