ओबीसी लोकप्रतिनिधी व ओबीसी समाज मेळावा कोल्हापूर - ओबीसी जनमोर्चा

    ओबीसी लोकप्रतिनिधी व ओबीसी समाज मेळावा आपल्या भारत देशात संविधान लागू झाल्यानंतरच समता प्रस्थापित होवू लागली. भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेले स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे मुलभत हक्कदेशाच्या स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही ओबीसींसाठी प्रस्थापित झाले नाहीत. हवक मिळविण्यासाठी लोकसंख्या निहाय सत्ता आणि संपत्तीचे वाटप झाले पाहिजे. ओबीसी चे राजकीय आरक्षण संपवणे म्हणजेच ओबीसींना नामशेष करण्याचे षडयंत्र मान. सुप्रिम कोर्टाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकार करत आहे. राजकीय हवक अधिकार हे मुलभूत आहेत. कारण सत्ता हे वाटपाचे केंद्र आहे. या देशातील साधन आणि संपत्तीवर मठभर लोकांचा वरचष्मा आहे. ही साधन, संपत्ती इथल्या मुळ सेवाकरी ओबीसी समाजांनी तयार केली आहे. त्या मध्ये या सेवाकरी ओबीसी समाजाला वाटा मिळू नये यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारातले उच्चवर्णिय व उच्चवर्गीय सतत कार्यरत आहेत.

 OBC samaj melava Kolhapur   मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर राजकीय प्रतिनिधीत्व म्हणून घटनात्मक तरतुदीमुळेच ग्रामपंचायत, तालुका पंचायत समिती, जिल्हापरिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आरक्षण लागू झाले. तेव्हा पासून आपल्या सेवाकरी ओबीसी मधील विविध जाती समुहांतील लोकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये मान सन्मानाच्या पदावर विराजमान झालेत. हे न पहावणाऱ्या उच्‍चवर्गीय व उच्चवर्णिय सत्ताधारी वर्गाने ओबीसीची सर्वच बाजूंनी अडवणूक सुरू केली. या सत्‍तेत अलुतेदार, बलुतेदार, भटके - विमुक्त जन जातींमधील लोक मान सन्मानाच्या पदांवर बसु लागण्याने त्यांना खुपू लागले. काहीही करून ओबीसींना सत्तेतला वाटा द्यायचाच नाही म्हणून साम, दाम, दंड, भेद निती वापरून ओबीसींना नामोहरण करण्याचे प्रयत्न सुरू झालेत. याचाच पहिला भाग म्हणून ओबीसींचे राजकीय प्रतिनिधित्व असलेले आरक्षण बंद करण्याचे षड़यंत्र सुरू झाले आहे. शासनाने काढलेल्या आधादेशाला कोर्टात आव्हान देणार आहेत.

    आपल्या संवेधानिक हक्‍कांवर गदा आणून आपले खच्चीकरण केले जात आहे. आपले राजकीय आरक्षण रद्द झाल्यास आपल्याला न्याय मिळवून देणारे कुणीच राहणार नाही. याबाबत व्यापक जनजागृती करण्‍यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील आजी माजी - भावी लोकप्रतिनिधी तसेच ओबीसी समाजांचा जाहीर मेळावा आपण रविवार दिनांक १२ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत दैवज्ञसमाज बोर्डिंग, मंगळवार पेठ, कोल्हापर येथे आयोजित केला आहे.

    सदरच्या मेळाव्यास ओबीसींची बाजू मान. सुप्रिम कोर्टात मांडणारे विधिज्ञ अँड. मृणाल ढोले - पाटील आणी अँड. मंगेश ससाणे हे प्रमुख मार्गदर्शन करणार असुन सदर मेळाव्याचे अध्यक्षस्थान ओबीसींचे लढाऊ नेतत्व माजी आमदार प्रकाश आण्णा शेडगे हे भुषविणार आहेत. तरी सदर मेळाव्यास आपण आपले राजकीय भेद बाजूला ठेवून आपल्या सहकाऱ्यांसह उपस्थित रहावे हि विनंती  श्रीमती सुलोचना नाईकवाडे (माजी उपमहापौर) । श्री मारुतराव कातवरे (माजी महापौर), मो.: ९४२१२८२६४० पी. ए. कुंभार मो.: ९६६५९०२२५५, चंद्रकांत कोवळे मो.: ९९२१४८३४५८, शिवाजी माळकर मो.: ९४२३२४२११२ सुधाकर पेडणेकर, धोंडीराम जावळे, गणी आजरेकर, अजय अकोळकर, रफीक शेख, किशोर लिमकर, ता. अध्यक्ष सर्वश्री. कृष्णात बामणे रघुनाथ शिंदे, एम. के. सुतार, दिलीप सुतार, दिनकर लोहार, सागर भोसले, पांडुरंग कुंभार, कृष्णात माळी, प्रविण गुरव, प्रा. महादेव सुतार, बाबासाहेब बागडी, कोल्हापूर शहर- अतुल भालकर, ज्ञानेश्वर सुतार, बाळासाहेब नागरगोजे, अशोक स्वामी (कोल्हापूर) शामराव खोत, इंजि. प्रशांत हावळ, गजानन समंग, संजय मकोटे, गजानन लिंगम, बाबासाहेब काशिद, राजाराम शिंदे, अनिल पोतदार, कुंडलिक पानारी, दिगंबर लोहार सरचिटणीस ओबीसी जनमोर्चा, सयाजी झुंजार, राज्य चिटणीस ओबीसी जनमोर्चा,  आयोजक:- ओबीसी सेवा फाऊंडेशन, कोल्हापूर यांच्‍या तर्फे करण्‍यात आलेली आहे.  

 

Satyashodhak, obc, Mahatma phule, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209