औरंगाबाद : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम व्हावे, यासाठी महाविकास आाघाडी सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. सर्व विरोधी पक्षांशी चर्चा करूनच राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढला आहे. परंतु, भाजपा हा नेहमीच ओबीसी विरोधी राहला आहे. मंडल विरोधी आंदोलनात नेहमीच हा पक्ष आघाडीवर राहलेला आहे. आता जळगाव जिल्हा भाजपचे सरचिटणीस राहुल वाघ यांनी या अध्यादेशाला औरंगाबादच्या खंडपीठात आव्हान दिले आहे. यावरून भाजपची ओबीसी विरोधी भूमिका असल्याचे स्पष्ट होते, असा हल्लाबोल शनिवारी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री व ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांनी चढवला.
राहुल वाघ हा कोण आहे, हे सांगताना भुजबळ यांनी आपल्या मोबाइल मधील फोटो दाखवले. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत राहुल वाघ दिसत आहेत. ह्या वरून या ओबीसी विरोधी कटकारस्थानाचा कर्ताधर्ता कोण आहे हे त्यांनी स्पष्ट केले. एकीकडे ओबीसींना गोंजरायचे आणि त्यांचे अधिकार देण्याची वेळ येताच असा विरोध करायचा ? ओबीसींबद्दल खरो खर जर प्रेम आसेल तर केंद्राकडून ओबीसींचा इम्पिरिकल डाटा मिळवून द्या, असे आव्हान बिजीपीचे फडणवीस यांना दिले.
बीड येथील ओबीसी मेळाव्यास मार्गदर्शन करून लगेचच सायंकाळी ते औरंगाबादेत पोहोचले. पत्रकारांनी गाठले असता त्यांनी त्यांच्या विविध प्रश्नांना उत्सफुर्ती पणे उत्तरे दिली. ओबीसींची जातीनिहाय जनगणना भारतात कधी तरी होउ शकेल का, या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, प्रयत्न चालू आहेत. जरा तुम्ही सर्व पत्रकारांनी जोर लावला पाहिजे.
ओबीसींना अडकित्त्यात पकडण्याचा प्रयत्न इथला मनुवाद विचार करतोय, असा आरोप त्यांनी केला. केंद्र - राज्य संबंधांवर ते म्हणाले, केंद्र व राज्यांना भारतीय राज्यघटनेने विशिष्ट अधिकार दिले आहेत. सध्या राज्य सरकारच्या अधिकारावर जोरदार अतिक्रमण होत आहे. हे सर्व दिसतच आहे. मुंबईचे पोलीस जणू काहीच करीतच नाहीत, असे दाखवले जात आहे. परंतु मुंबईचे पोलीसांची तुलना स्कॉटलंडच्या पोलिसां बरोबर होते. मुंबईचे पोलीस स्कॉटलंडच्या पोलिसां हुन अधिक सक्षम आहेत. तरीही ईडी, सीबीआयची चौकशीचे फेरे लावली जात आहे. केंद्र सरकार राज्याचे हक्काचे जीएसटीचे पैसे का देत नाही ? बॉलिवूडला तर बदनाम करण्याचा विडाच उचलला गेला असल्याचा आरोप त्यांनी केला. समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांनी आयोजित केलेल्या सत्कारातही त्यांनी मार्गदशन पर भाषण केले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, dr Babasaheb Ambedkar