महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) चाचणी परीक्षेत उत्तीर्ण व एमपीएससी आणि यूपीएससी पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी निवड झालेल्यांना विद्यावेतन मिळत नसल्याने विद्यार्थी आक्रमक झाले असून ते राज्यभर आंदोलन करणार आहेत.
महाज्योतीने १३सप्टेंबर २०२१ रोजी एमपीएससी आणि यूपीएससी प्रशिक्षण परीक्षा आयोजित केली होती. त्यात यशस्वी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण १८ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू झाले. प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाज्योतीशी संपर्क साधला असता त्यांना प्रशिक्षणादरम्यान कोणताही निर्वाह भत्ता मिळणार नाही, असे सांगण्यात आले. मात्र दुसरीकडे मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या 'सारथी' या संस्थेकडून प्रशिक्षणार्थीना निर्वाह भत्ता मिळतो. मग महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना का मिळू नये, असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे.
गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना विद्यावेतनाच्या माध्यमातून आर्थिक मदत न करण्याचे महाज्योतीचे धोरण म्हणजे ओबीसी / व्हीजेएनटी / एसबीसीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. अशाप्रकारे ओबीसी विद्यार्थ्यांना सापत्न वागणूक दिली जात आहे, असे प्रशिक्षणार्थी विद्याथ्यांचे म्हणणे आहे.
या विरोधात बुधवारी विद्यार्थ्यांनी इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांना सकाळी १० पासून त्यांच्या भ्रमणध्वनीवर संदेश पाठवून मागण्यांकडे लक्ष वेधले.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती - २०२१ साठी उमेदवारांची मुलाखतन घेताच निवड करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०१७-१८व त्यानंतरपीएचडीकरिता विद्यापीठात नोंदणी केलेल्या उमेदवारांना अधिछात्रवृत्तीसाठी अर्ज करण्यास सांगण्यात आले होते.या योजनेंतर्गत ५०० विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांची अंतिम निवड ही मुलाखतीद्वारे करण्यात येईल, असे जाहिरातीमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले होते. परंतु महाज्योतीने मुलाखतन घेता उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशित केली आहे. त्यामुळे अनेक पात्र उमेदवारांवर अन्याय झालाआहे. यासाठी बुधवारी राज्यातील अनेक विद्यार्थी नागपुरातील महाज्योतीच्या कार्यालयात दाखल झाले.
उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावण्यात आले. त्यावेळी काही प्रश्न विचारण्यात आले. तीच मुलाखत होती. विद्यावेतन ऑफलाईन कोचिंग सुरू केल्यानंतरदिले जाईल." - प्रा. दिवाकरगमे, संचालक, महाज्योती.
Satyashodhak, obc, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, dr Babasaheb Ambedkar