इतिहासाच्या पाना पानात आपला इतिहास आहे. त्या काळात समाज मनाचा अविष्कार म्हणून साहित्याने आपला ठसा उमटविला आहे. मग बौद्ध, चावार्क, संत परंपरा, फुले, शाहू, अंबेडकर विचार प्रणाली ही समाज घडविण्याची एक परंपरा आहे. परंतू आपल्या जातींना एक तंत्र वापरून दडपण्याची पद्धत इतिहास काळा पासून प्रतिष्टीत म्हणून राबवली जात आहे. परंतू या परंपरेला ही आपल्या त्या त्या काहातील विद्वानांनी तोंड देऊन आपल्यात ऐतिकासीक निर्मीतीची वाटचाल निर्माण करून ठेवली. मग काळानरूप अभंग, अखंड, कथा, भारूडे, नाट्य विविध परंपरा यातून जी साहित्य निर्मीती झाली त्यामुळे आकाशाला गवसणी घतली जात आहे.
ओ. बी. सी. संघर्ष समिती हीच मुळात ओ.बी.सी.च्या सर्व जातीत पोहचून त्यांचे जाती सह ओबीसी म्हणून एकरूपता येणे गरजेचे होते. ते ऐतिहासिक कार्य प्रथम केले. न्यायालयीन लढाई जिंकून विजय मेळावा घेऊन ओबीसींच्या जीवन मरणाच्या प्रश्नातला महत्वाचा केंद्र बिंदू ठरली गेली. क्रिमीलेअर मर्यादा, शैक्षणिक सवलती, आर्थिक मागास वर्गीय वित्त सहकार्य, ओबीसींचा राखीव जागा भरणे, खाजगी क्षेत्रात राखीव जागा ठेवने. या विविध प्रश्ना बाबात महाराष्ट्र ओबीसी समिती समाज प्रवाहात प्रबोधन रचना व संघर्ष करित आहे. हे करिताना विधान सभा व विधान परिषदेत आपल्यावर होणारा अन्याय किंवा रास्त मागण्या मंजूर करणे. ओबीसी व बीसी समाजातील आमदारांचा गट प्रभावी करणे हे कार्य आपणा सर्वांच्या सहकार्यावर केले जात आहे.
इतिहासात आपण पाहिले तर रंजला, गांजला पिळलेला, पोळलेला, भरडला जाणारा आपला ओबीसी समाजात गावकूसात राहून समदुखी असल्याने एक होता. तो जग मुठीत ठेवणारा होता. म्हणून स्वातंत्र्यात्याच्या रण संग्रामत तो आघाडीवर होता. अनेकांचे संसार उध्वस्त झाले . वडूज येथे युनियन जॅक हा इंग्रजांचा झेंडा उतरवून तिरंगा फडकवीताना हुतात्मा झालेले ओबीसी होते. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रती सरकारचे अनेक म्होरके ओबीसी होते. संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात ओबीसी तळपती तलवार होती. हा आपली देश सेवाच आहे. आज स्वातंत्र्य आले . स्वातंत्र्यात आपण सामाजीक, अर्थिक, राजकीय बाबत पिछाडीवर आहेत. जे मिळाले ते जतन करून जे मिळत नाही त्यासाठी संघर्ष ही आपली वाटचाल आहे.
या वाट चालीत साहित्य ही एक समाज घडविण्याची परंपरा एकत्र करून गरजेची आहे. तसा गत ४/५ वर्शा पर्यंत सुरू होता. आज पहिल्या साहित्य संमेलनाच्या रूपाने सुरवात होत आहे. महाराष्ट्र ओ.बी.सी. संघर्ष समितीच्या द्वारे आपण सर्वांचे आभार.
मा. आ. सुधाकर गणगणे
Satyashodhak, obc, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, dr Babasaheb Ambedkar