ओबीसींना शिक्षणक्षेत्रात २७ टक्के आरक्षण देण्याच्या मुद्यावरून उफाळलेल्या आरक्षणविरोधाच्या आंदोलनाच्या निमित्ताने समाजातील अदृश्यझाकलेलेले जास्त वास्तव पुन्हा एकदा समोर आले. या विषयावर सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा वर्चस्ववादी समाज आपले आसन बळकट करण्यासाठी डोके वर काढत आहे. त्याला सर्व स्तरातून विरोध होणे आवश्यक आहे.
इंग्रजांच्या काळातील रेव्हरंड मरे मिचेलांच्या ग्रंथातील उल्लेख, “कनिष्ठ वर्गातील काही मुलांनी त्या काळी शिकण्याचा प्रयत्न केला . त्यांना ब्राह्मणांनी अत्यंत निर्दयपणे वागवून त्यांचा छळ केला. रेव्हरंड आदम व्हाईट यांनी एकदा पुण्याजवळील सरकारी शाळेला भेट दिली. त्या शाळेतील ब्राह्मण पंतोजीजवळ एक वेताची छडी होती आणि काही मातीची ढेकळे होती. व्हाईट यांनी ब्राह्मण पंतोजींना विचारले की, “ही ढेकळे तुमच्याजवळ कशा करता ठेवली आहेत ?” पंतोजी उत्तरले, “स्पृश्य मुलांच्या बाबतीत मी छडी वापरतो. परंतु अस्पृश्यांच्या मुलांना मारायचे असेल तर मी एक ढेकूळ घेतो आणि त्याच्याकडे फरकवतो. त्यामुळे मला विटाळ होत नाही.”
दीडशे वर्षांपूर्वीची उच्च जातींची वर्णवर्चस्वाची मानसिकता बदलली आहे काय ? आज कदाचित पूर्वीसारखी अस्पृश्यता पाळली जात नाही, परंतु वर्णश्रेष्ठत्वाची मानसिकता आजही तेवढीच कायम आहे. आयआयटीमध्ये ओबीसींना आरक्षण देण्याच्या मुद्यावरून आरक्षणविरोधी आंदोलकांनी गुणवत्तेचा मुद्दा पुढे करत आपल्या वर्चस्ववादी मानसिकतेचे दर्शन घडविले. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या हिरवळीवर गालीचे आंथरून त्यावरून गिटारच्या साथीन “आपनी औकात मे रिहयो बँधे” हे गाणे म्हटले जात होते व मिडियातून ते लाईव्ह दाखविले जात होते. कनिष्ठ जातीयांना त्यांची “औकात' दाखविण्याचा प्रकार म्हणजे “अस्पृश्यताच" आहे.
'हिंदू धर्म खतरे मे.' हा जसा फॅसिझम आहे तसाच ‘मेरीट खतरे मे.' अशी हाकाटी कारणे हा देशील एक फॅसिझम आहे. 'गुणवत्ता विरूद्ध राखीव जागा' असे समीकरण मांडणे हा आरक्षणविरोधी आंदोलनाचा इन्व्हेंटचा गाभा आहे. देशातील ८५ टक्के जनता ही अकार्यक्षम, गुणवत्ताहीन व लायकीप्रमाणे योग्य ते पद मिळवण्यास अपात्र आहे असा शिक्का वरचा वर्ग मारीत आहे हे भयंकर आहे. सामाजिक आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय संपत्तीची (जमिनीची) विषम वाटणीच्या पातळीवरील भिन्नतेमुळे संधीमध्ये असमानता असताना गुणवत्तेचा विचार यांत्रिकपणे करणे हे उच्चजातींच्या सोयीचे आहे. उच्चजातीयांची सामाजिक सुविधांची पार्श्वभूमी काढून टाकून त्यांचे मूल्यांकन केले गेले तर त्यांच्या तथाकथित गुणवत्तेचे काय होईल ?
प्रत्यक्षात आरक्षण विरोधकांचे गुणवत्ता प्रेम अत्यंत बेगडी व ढोंगीपणाचे आहे त्यांना गुणवत्ते बद्दल प्रेम असते तर लाखे रूपयांत विकल्या जाणाऱ्या व्यवस्थापन कोट्याबाबत ते का बोलत नाहीत ? एन. आर. आय. कोट्यातील जागांसाठी प्रवेश परीक्षेलादेखील बसण्याची गरज नसते . मग त्यात उर्तीर्ण होणे तर दूरच. त्याबद्दल या मंडळींनी कधी आंदोलने केलीत ? सरकारी महाविद्यालयांमध्ये “धनवत्ते” च्या बळावर या मंडळींनी जागा पटकावून आपले वर्चस्व अबाधित ठेवायचे आहे हेच खरे.
रोहन देशपांडे या विद्यार्थ्याला महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या परीक्षेत (एमएच-सीईटी) ४२ टक्के गुण मिळाले होते व त्याचा गुणवत्ता यादीतील क्रमांक होता ४६३१९ याच विद्यार्थ्यांला भारती विद्यापीठात धनवत्तेच्या बळावर प्रवेश मिळाला. विनीता पाटील या विद्यर्थिनीला सरकारी प्रवेश फक्त ३० टक्के गुण मिळालेत व तिचा कमांक होता ५१७४९. तिलाही भारती विद्यापीठात प्रवेश मिळाला. सुनील देशमुखला ४१.५ टक्के वर प्रवेश मिळाला. संपूर्ण महाराष्ट्रात असा एकही मागासवर्गीय विद्यार्थी नाही ज्यास ३९ टक्के वर एम.बी. बी. एस. ला. प्रवेश मिळाला. प्रवेश परीक्षेस पात्र होण्यासाठी किमान ४० टक्के गुणांची अट आहे. सर्व अनुकूल परिस्थिती व प्रचंड पैसा असूनही जे अत्यंत कमी गुण मिळवितात त्यांना प्रवेश मिळतो. हे चालते, परंतु प्रतिकुल परिस्थितीतही यापेक्षा कितीतरी अधिक गुण मिळविणारे मागासवर्गीय चालत नाहीत याला काय म्हणावे ? हा जातीवाद आणि वर्णवर्चस्ववाद नाही असे म्हणता येईल काय ? तथाकथित 'नॉलेज' कमिशनचे पित्रोदा आणि आपल्या सामाजवाद्यांना ज्यांच्याबद्दल कौतुक वाटते ते आंद्रे बेटेल याबाबत कौतुक वाटते ते आंद्रे बेटेली याबाबत काहीच बोलत नाहीत. हेमंत देसाई सारख्यांचा समाजवादाचा मुखवटेदेखील यानिमित्ताने गळून पडला. (साधनातील देसाईचा लेख अर्जुनसिंगांचा बंडलवाद) हे बरेच झाले ! श्रीमतांच्या ‘राखीव जागा' व त्यामुळे होणारी गुणवत्तेची हत्या या मंडळींना दिसत नाही असे कसे म्हणता येईल ?
महाराष्ट्रात अभियांत्रिकीच्या एकूण जागा आहेत ४५११२ तर त्यापैकी ४१००३ इतक्या जागा खाजगी संस्थांच्या ताब्यात आहेत.
२००३-२००४ या वर्षी अभियांत्रिकीसाठी जे प्रेवश झालेत त्यातील एकूण ४५११२ जागांपैकी फक्त १८ टक्के (८११७) जागांवर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले . उर्वरीत ८२ टकके जागा उच्च जातींना आणिधनदांडगयांनी धनवत्तेच्या बळावर बळकावल्या ही वस्तस्थीती आहे.
आरक्षणामुळे 'मेरिट खतरे में' म्हणणाऱ्यांसाठी आणि आरक्षणामुळे उच्च जातींच्या संधी कमी होतात असे म्हणणाऱ्यांच्या डोळयात अंजन घालणाऱ्या उपरोक्त आकडेवारीचा शांतपणे विचार करावा आणि वणर्वचस्वाची भुमिका सोडून द्यावी हेच त्यांच्या व एकूणच समाजाच्याही हिताचे आहे.
उमेश माळगे,
Satyashodhak, obc, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, dr Babasaheb Ambedkar