छ. शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नव्हे तर ... बहुजनप्रतिपालक 

    “भारतात स्वातंत्र्याचा सुर्य उगवणारे छ. शिवाजी महाराजांना देण्यात येणाऱ्या पदव्या, त्यांच्याबाबत येणारी विशेषणे आणि त्यांना लावलेली बिरूदावलीत “क्षत्रिय कुलावतंस” “कुळवाडी भूषण” “बहुजनप्रतिपालक” “गोब्राह्मणप्रतिपालक” ही विशेषणे मुख्यत वापरली जातात सर्व सामान्य जनतेला प्रश्न पडतो की शिवाजी राजांचे नमके बिरूद काणते ? शिवाजी राजांसाठी ही वेगवेगळी विशेषणे कां वापरली जातात. या सर्वामध्ये शिवाजी राजांच्या जीवन कर्तृत्वाचे नेमके दर्शन कोणत्या शब्दा मधून होते. ही बाब थोडी लक्षपूर्वक बघितली व तपासली पाहिजे तसेच आजकाल “गोब्राह्मणप्रतिपालक' या शब्दावर सर्व थरातून निषेध व आक्षेप घेतला जातो. त्यामागचे खरे कारण काय याबाबत सविस्तर ...."

    छ. शिवाजी राजांच्या कर्तृत्वाने आकलन होण्यासाठी शिवाजी राजांच्या उदयापूर्वी भारतातील व विशेषतः महराष्ट्रातील राजकीय परिस्थिती समाजरचनेचे, धार्मिक व आर्थिक बाबींचे विश्लेषण करणे गरजेचे आहे. शिवाजी राजांच्या जन्माच्यावेही उत्तरेतील मुघल सुल्तान, विजापुरची आदिलशाही व अहमदनगरची निजामशाही या तीन राजवटींचे महाराष्ट्रावर राज्य होते. हे तीन ही राज्यकर्ते इस्लामधर्मीय होते. शेकडा ऐंशी ते नव्वद टक्के प्रजा हिंदू या सत्ते खाली येत होती. (येथे हिंदू मुस्लीमेत्तर असा अर्थ अभिप्रेत आहे.)

Bahujan Pratipalak Chhatrapati Shivaji Maharaj    मुघल घराणे हे मुळ तुर्क घराणे. या घराण्यातील काबुलचा सुलतान बाबर याने इ. स. १५२५ मध्ये भारतात आक्रमण केले व दिल्लीचा अफगाण इब्राहीन लोधी याचा पानिपतच्या पहिल्या लढाईत पराभूत करून दिल्लीला मुघल घराण्याचे राज्य स्थापन केले. आदिलशाही ही पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात बहमनी सल्तनतीच्या पतनानंतर निर्माण णाली. आदिलशाहीचा संस्थापक युसूफ आदिलखान हा होय. हे घराणे तुर्क घराणे होते. निजामशाही स्थापना इ.स. १४९० मध्ये मलीक अहमदने केली. त्याने अहमद निजामशाह बहरी असे नाव धारण केले व आपल्या नावाची नाणी पाडली. याच काळात जातीयवाद व धार्मिक श्रद्धा, रूढी, परंपरा यांच्यात सर्व जनता गुरफटलेली होती. अनेक पंथोपंथानी आपली वेगवेगळी चूल मांडली होती. स्मृती पुरोणोक्त धर्माच्या व कर्मकांडाच्या विरोधात “महानुभव” हा समतावादी स्त्री-पुरूष समानतेचा पुकार करणाऱ्या धर्मपंथाची स्थापना गुजराथेतील चक्रधराने केली होती. त्यांची अमानुष हत्या हेमाद्री पंडिताने केल्यानंतर हा पंथ गुप्त स्वरूपात व गुप्तलिपीत मध्ये आपले कार्य करीत होता. बौद्ध धर्म पूर्ण नामशेष झाला होता. तर जैन धर्मीयांची संख्या अत्यल्प होती. कर्नाटक सीमेवर वीरशैव हा बसवेश्वराने स्थापन केललेला शिवउपासक व लिंगपूजक धर्मपंथ चांगलेच पाय रोवून होता. हा धर्म पंथ ही एकेश्वरवादी असून जत्यंत व स्त्री पुरूष समानतेत विश्वास ठेवणारा होता. या शिवायच दत्त संप्रदाय, शाक्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, नाथपंथ या सारखे अनेक धर्मपंथ आपआपल्या मर्यादित प्रभाव टिकवून होते. हे सर्व धर्मपंथ जरी असले तरी बहुसंख्य लोकांवर प्रभाव टाकणारे दोन महत्वाचे धार्मिक प्रवाह होते. त्यातील पहिला म्हणजे भागवत धर्म म्हणजेच वारकरी संप्रदाय, या धर्माची स्थापना संत नामदेव यांनी केली. कर्मकांड पुरोहितशाहीच्या व अंध श्रद्धांच्या विरोधात बहुजन-हरिजन समाजाच प्रबोधन करण्यासाठी या धर्मापंथाचे प्रयोजन होते.

    याच दरम्यान दि. १९ फेब्रुवारी दि. १६३० रोजी किल्ले शिवनेरी येथे शिवरायांचा जन्म झाला. बालपणापसून शिवाजीवर मॉ. जिजाऊनी अंत्यंत उत्तम प्रतींचे संस्कार केले. जिजाऊंना शस्त्रास्त्र चालविण्याची व घोडे स्वारीची कला अवगत होती. त्यांनी हि कला शिवाजीना लहानपणापासुन शिकविण्यास सुरूवात केली शिवाजी महाराजांच्या जन्मानंतरची सुरूवातीची दहा बारा वर्षे, शिवनेरी, सिंदखेड राजा, पुणे जहागीर, बंगलोर अशी धावपळीत जात असतांना पुणे व आसपासच्या परिसराच्या भौगौलिक, सामाजीक व राजकीय परिस्थितीचे आकलन करून जिजाऊनी सन १६४२ साला पासून स्वराज्य स्थापनेसाठी सुरूवात केली आणि शिवाजी राजांना त्यादृष्टीने वाटचाल करण्यात मार्गदर्शक केली . मोगल साम्राज्याच्या पारतंत्र्यात जखडलेल्या राज्याला शिवाजी महाराजांनी जिजाऊंच्या मार्गदर्शना नुसार उगवला.

    अठरा पगड जातींच्या मावळ्यांना बरोबर घेऊन शिवरायांनी स्वराज्य निर्माण करण्यास सुरूवात केली. एक एक किल्ले व त्याभोवतालीचा भाग स्वतंत्र्य करून आपल्या ताब्यात घेतला. कमी कालावधीत अवघ्या महाराष्ट्रात स्वराज्य सथापन केले. अनेक संकटे, तडजोडी, तह परकिंयाचे आक्रमणे, स्वकीयांचा रोष, द्वेष पत्करत स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवाजी महाराजांना देण्यात येणाऱ्या पदव्या त्यांच्या बाबत. वापरण्यात येणारी विशेषणे आणि त्यांना लावलेल्या बिरूदावलीत "क्षत्रिय कुलावतंस” “कुळवाडी भूषण” “बहुजनप्रतिपालक” आणि “गोब्राह्मणप्रतिपालक” हि विशेषणे मुख्यतः वापरली जातात. सर्वसामन्य जनतेला प्रश्न पडतो की शिवाजी राजांच्या जीवन कर्तव्याचे नमेके दर्शन कोणत्या पदवीमाधून होते. ही बाब थोडी लक्षपूर्वक बघितली व तपासली तसेच आजकाल “गोब्राह्मणप्रतिपालक" या शब्दावर सर्व थरातून निषेध व आक्षेप घेतला जातो. त्यामागचे खरे कारण काय. त्यावर इतिहासातील घटनांचे उदाहरण काही प्रश्न निर्माण करतात. त्याबद्दल बघूया...

    “गोब्राह्मणाप्रतिपालक” या विरूद्धचा आपण सर्व प्रथम विचार करू गोब्राह्मणप्रतिपालक या शब्दाचा अर्थ गायी व ब्राह्मण यांचे पालन करणारा असा होतो. शिवरायांनी आपल्या राज्यातील गायींचे व ब्राह्मणांचे रक्षण केले या बद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु त्यांना हे बिरूद लावणे याचा अर्थ त्यांनी आपल्या आयुष्याचे उद्दिष्ट म्हणून हे कार्य स्वीकारले होते असा होतो. म्हणजेच शिवाजी राजांनी आयुष्यभर गायी व ब्राह्मण यांना सांभाळण्याचेच कार्य केले आणि त्यांनी स्वराज्य निर्माण केले ते महाकार्य यापुढे गौण आहे असे होय. आपल्या प्रजेचा हिस्सा म्हणून सर्व जाती धर्म मग त्यात ब्राह्मण ही आले त्यांना प्रतिपालन करणे व उपयोगितेच्या दृष्टिकोनातून आपल्या राज्यातील नव्हे तर परराज्यातील ही मुकजनावर म्हणून गाय काय किंवा म्हैस काय या बद्दल देखिल सहानभूती दाखवणे ही झाली एक बाब पण तेच त्यांचे मुख्य जीवितकार्य होते. असा समज पसरवणे ही पूर्णत वेगळी बाब आहे. यामध्ये उच्चता निच्चता दाखविण्याचा निर्देश आहे. शिवाजीराजांनी तरी आपल्या संपूर्ण जीवना मध्ये स्वतःला कधी गोब्राह्मण प्रतिपालक ही पदवी लावून घेतलेली नाही अथवा त्यांच्या राजमुद्रेमध्ये ही हे शब्द नाहीत. त्यांचा अस्सल पत्रव्यवहार इतिहास संशोधन मंडळाकडे उपलब्ध आहे. त्यामध्ये ही कोठेही असा उल्लेख त्यांनी स्वतःबाबत केलेला आढळून येत नाही. म्हणजेच त्यांच्या आयुष्याचे तेच एकमेव अथवा महत्वाचे ध्येय नाही व त्यांच्या कार्यामधून ही ते फक्त गोब्राह्मणप्रतिपालक असल्याचे सिद्ध होत नाही. मग हा खोटा डोलारा कसा व कशाच्या आधारे उभारण्यात आला व यामागील षडयंत्र कसे ते पाहुया :- शिवाजी राजांना त्यांच्या स्वराज्यस्थापनेच्या कार्यात सर्व जातीच्या, धर्माच्या जनतेने सहकार्य केले होते. शिवाजीराजे त्या सर्वाचाच प्रतिपाळ करीत होते. हे सत्य असून ते एक विशिष्ट जातीचाच प्रतिपाल करीत होते असे म्हणणे विपर्यस्त, खोटे व दिशाभूल करणारे आहे. शिवाजीराजांनी प्रभावली प्रांताच्या “ब्राम्हण म्हणून कोण मुलहिजा करतो. या उपरि बोभट अलिया उपरि तुमचा मुलाहिजा करणार नाही. गनिमांचे चाकार, गनिम जालेस, ऐसे जाणून बरा नतीजा तुम्हास पावेल ताकीद असे” असा मजकूर होता. या वाक्यावरूनच त्यांना स्वराज्यापेक्षा कोणतीही जात महत्वाची वाटत नव्हती हे स्पष्ट होते. अफजलखानाचा वकील कृष्णाजी कुलकर्णी च्या बाबत शिवाजी राजांनी घेतलेल्या भूमिकेनेही हेच सिद्ध होते.

    दुसऱ्या बाजूने विचार केल्यास व बारकाईने इतिहास वाचला तर असे लक्षात येते की ब्राह्मणांना तरी शिवाजीराजे आपले आदर्श, तारणहार अथवा आपल्या जातीचे एकमेव रक्षण कर्ते वाटत होते काय ? किंवा शिवरायांचे राज्य तरी त्यांना आपले वाटत होते काय ? शिवचरित्रातील महत्वपूर्ण घटनांचा विचार करता या प्रश्नांचे उत्तर नकारर्थी येते. जर ब्राह्मणांना शिवाजीराजे आपले एकमेव रक्षणकर्ते वाटत असते तर दादोजी कोंडदेवाने शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या कल्पनेला विरोध केला नसता, वाईच्या ब्राह्मणांनी अफजलखानाच्या सत्कार करून त्याला शिवाजीराजांना ठार मारण्यासाठी शुभेच्छा दिल्या नसत्या आणि त्याच्या मोबदल्यात अफजलखानाकडून सनदही मिळवल्या नसत्या. कृष्णाजी कुलकर्णी अफजलखानाचा वकील झाला नसता व जरी झाला असता तरी त्याने शिवाजीराजांवर वार नक्कीच केला नसता. जर असेच असते तर ब्राह्मणाभिमानी रामदास, शिवाजीराजांचे कट्टर शत्रू असलेल्या बाजी घोरपडे व मुरार जगदेवराव या आदिलशाही सदारांच्या अश्रीत रहिलेच नसते. रामदासांच्या चाफळच्या मठाला आदिलशहाच्या सनदा होत्या त्या त्यांनी स्विकारल्याच नसत्या. मिर्झराजे, जयसिंग व दिलेरखान प्रचंड सैन्यानिशी शिवाजीराजांवर चालून येत असतांना मोगलांचा विजय व्हावा व शिवाजीराजे पराभूत व्हावेत म्हणून सासवडच्या ब्राम्हणांनी अनुष्ठाने बसवून कोटीचंडी यज्ञ घातलाच नसता . शिवाजी राजांच्या राज्यभिषेकाचा प्रस्ताव समोर येताच मोरोपंत पिंगळे सारख्या शिवाजी राजांच्या एकनिष्ठ म्हणविल्या जाणाऱ्या सरकारी कारकुनाला देखील मराठ्यांच्या हाताखाली आम्ही ब्राह्मणांनी कसे काम करावे ? असा प्रश्न पडला नसता. शिवराज्याभिषेकाला तमाम महाराष्ट्रीय ब्राह्मणांनी नकार दिला नसता. औरंगजेबने जिझिया कर लादल्यावर त्याला शिवाजीराजांनी विरोध केला व आपली सामाजिक बांधिलकी दाखवून दिली. या उलट ब्राह्मणांनी आम्ही हिंदू नसून ब्राह्मण आहोत. आम्ही हिंदू पेक्षा वेगळे म्हणजे वैदिक आहोत त्यामुळे आम्ही जिझिया कराच्या कक्षेत येत नाहीत. अशी कावेबाज व स्वजातीच्या फायद्याचीच भूमिका घेतली. धर्मरक्षणाचा आव आणण्याऱ्यांचा खरा धर्म यामुधन उघडकीला आला. अशी अनेक उदाहरणे असून त्याबद्दलचे ऐतिहासिक पुरावे देखील उपलब्ध आहेत. परंतु प्रचंड जातीअभिमानी इतिहासलेखकांनी हे पुरावे पुढे येऊ दिले नाहीत आणि त्याउलट शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेला विरोध करणाऱ्यांचे व स्वराज्यस्थापनेशी दुरान्वयानेही संबंध नसणाऱ्यांचे इतिहास लेखनाच्या नावावर मोठ्या प्रमाणावर उदात्तीकरण केले गेले स्वतःच्या फायद्यासाठी शिवाजीराजांच्या चरित्राचे ब्राह्मणीकरण करण्यात आले व मुळात ब्राम्हणांचा शिवाजीराजांना असलेला विरोध लपविण्यात आला यासाठी पुरावे म्हणून पेशवेकालीन बखरीमधील ब्राह्मणपोषक असणारे संदर्भ दिले गेले. अनेक भाकडकथांची निर्मिती करून त्या भाकड कथा शिवचरित्रात घुसडल्या गेल्या व त्याने शिवाजीराजांच्या ब्राह्मणीकरणाच्या प्रयत्नांना बळकटी दिली गेली. बाबापुरंदरे सारख्या प्रचारकी बाजाच्या गल्लाभरू शाहिराच्या पुस्तकांमधून नाटकामधून या सर्व गोष्टींचा धुमधडाक्यात प्रचार व प्रसार करण्यात आला.

    प्रारंभी शिवचिरत्राला व शिवकार्याला दुलक्षित करून शिवाजीराजांचा इतिहास व शिवाजीराजे विस्मरणात जावेत यासाठी प्रयत्नही झाले होते. परंतु हा डाव जोतीराव फुले नावाच्या दृष्ट्या महामानवाने हाणून पाडला. महात्मा फुले यांनी सन १८६९ मध्ये सतत चार दिवस परिश्रम घेऊन रायगडावरील शिवाजी राजांची समाधी शोधन काढली तिची साफसफाई केली व त्यावर फुले वाहिली. महात्मा जोतिराव फुले यांनी सन १८६९ मध्ये छत्रपती शिवाजीराजांवर सुमारे एक हजार ओळींचा प्रदीर्घ पोवाडा रचला व प्रसिद्ध केला व १८८५ मध्येच शिवजयंती उत्सव महात्मा फुले यांनी सुरू केला तसेच १८८५ मध्ये म. फुल्यांनीच पहिल्या प्रथम शिवाजीराजांची समाधीची पुनःस्थापना करण्यास सुरूवात केली.

    शिवाजीराजे जन्माने कुळवाडी अथवा मराठा होते त्यांनी अव्दितीय पराक्रम गाजविल्यामुळे ते कुळवाडी भूषण होते. त्यांनी आपल्य कारकिर्दीत शेतकरी, सामान्य रयत , सर्व जातीजमाती व धर्माने अबला ठरविलेल्या स्त्रिया यांच्या हितासाठी काय काय केले ते पाहू कारण यावरूनच “कुळवाडीभूषण” अथवा "बहुजनप्रतिपालक' ही पदवी शिवाजीराजांच्या जीवनकृर्तृत्वाचे यथार्थ दर्शन घडवते किंवा कसे हे लक्षात येऊ शकेल. शिवाजीराजांनी आपल्या रयतेबद्दल विशेषतः शेतकरी व रयत यांच्याबद्दल विशेष जिव्हाळा होता. या दोन्ही शोषितकांवर अन्याय होऊ नये म्हणून ते अतिशय दक्ष होते. गाई बैल या शेतकऱ्यासांठी उपयुक्त प्राण्यांकडे ही ते विशेष लक्ष देत असत. शिवाजीराज्यांचे सैन्य विविध जाती जमातीतील कष्टकरी लोकांपासून बनलेले होते. त्यांच्या सुखसोयीबद्दल ते काळजी घेत असत त्याच बरोबर त्यांनी शिस्तपालन करावे व रयतेला छळू नये याकडे ही त्यांचा कटाक्ष असे. शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या शासन काळात देशमुख, पाटील कुलकर्णी इत्यादी मध्ययुगीन सरंजामदार हे सारावसुलीसाठी सामान्य जनतेची प्रचंड पिळवणूक करीत असत मनमानी कारभार करून व जबरदस्ती करून जास्तीचा सारा वसुली करीत त्यामुळे रयत त्रासुन गेली होती. सामान्य माणासाचा कोणी वाली नव्हता. गरीब स्त्रियांच्या अब्रुचे धिंधवडे निघत. सैन्य मोहिमेच्या वेळी शेतीची नासधूस करून शेतकऱ्यांच्या चीजवस्तु लुटल्या जात. ग्रामिण भागातून पाटील व कुलकर्णी हे प्रमुख असत आणि अनेक खेड्यांच्या समुहावर देशमुख व देशपांडे प्रमुख असत जमीनीचा वसुल आणि इतर व्यवस्था ह्या कामात ही मंडळी दक्षिणीचे बहमनी सुलतान आणि त्यांच्यानंतर आलेली निरनिराळे राज्ये यांची चाकरी बजावीत. त्या चाकरीच्या मोबदल्यात त्यांना मिळणाऱ्या नगद रक्कम, बिनसाऱ्याच्या जमिनी आणि लहान जहागिरी या सर्वानी मिळून ते वतनदार असत. काही वतनदार वाढत वाढत महत्वाचे सरंजामदार आणि जहागिरदार बनले.

    शिवाजीराजांनी या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला प्रजेच्या दुःखाचे निदान केले व त्यानंतर त्यावर उपाय योजना करण्यास सुरूवात केली त्यानी सर्वप्रथम जमिनीची मोजणी केली त्यामुळे सारा वसुलीत सुसुत्रता आली. रयतेस नवीन बी बियाणे व गुरे - ढोरे देण्याची व्यवस्था केली. उदरनिर्वाहासाठी धान्य देण्याची ही व्यवस्था केली पीक आल्यानंतर दोन-तीन वर्षाचे उत्पन्न पाहून वसुली करावी असे आदेश दिले. व सर्वात महत्वाचे म्हणजे वतनदारावर जरब बसवली वतनदारांनी रयतेला त्रास देऊ नये. मनमानी वसुली करू नये व सरकारी तिजोरीत वेळच्या वेळी भरणा करावा. असे आदेश दिले. या वरून शिवचरित्राचा थोडक्यात आढावा व सर्व ऐतिहासिक पुराव्याचा अभ्यास केला तर असे दिसून येते की शिवाजीराजांना व त्यांच्या स्वराज्याला ब्राह्मणांनी विरोध, शिवाजी राजांनी आयुष्यभर कर्मकांडा विरूद्ध केलेला संघर्ष, शाक्त राज्याभिषेकाद्वारे त्यांनी ब्राह्मणी प्रभुत्वास आव्हान, धर्माज्ञांचे उल्लंघन करून ब्राह्मणांना कलेले शासन या सर्व बाबी लक्षात घेता शिवाजीराजांना गोब्राह्मणप्रतिपालक असे संबोधणे हे कसे शक्य ?

    क्षत्रिय कुलवतंस ही शिवाजीराजांची पदवी त्यांना राज्यभिषेकासाठी धारण करावी लागली. रयतेवर जुलुम करणाऱ्या शासन करण्यासाठी व राज्यकारभारात सुसूत्रता येण्यासाठी हे आवश्यक होते. महान लढवया या अर्थाने व गौतम बुध्दाच्या “जो क्षेत्राच्या अधिपती तो क्षत्रिय” या व्याख्याते नुसार ते क्षत्रिय होते. त्यांनी सर्व जमातींच्या हाती शस्त्र देऊन व त्यांना जमिनी करण्याचा अधिकार देऊन किल्लेदार, गडप्रमुख व इतर लष्करीदृष्ट्या महत्वाच्या पदांवर “क्षत्रित" बनवले त्यामुळे हा अठरापगड जातीमध्ये विखुरलेला बहुजन समाज ऐतिहासिक संघर्ष करू शकला,. या सर्व क्षेत्रियांचे शिवाजी राजे नेते होते. याचा अर्थाने ते “क्षत्रिय कुलवतंस” होते. शिवाजीराजांच्या कामगिरीचे मुल्यमापन केले असता. त्यांचे संपूर्ण जीवन हे शेतकरी, गरीब व रयत यांच्या उत्थानासाठी समर्पित असल्याने निर्विवादपणे सिद्ध होते. त्यामुळे महात्मा फुले. यांनी शिवरायांना दिलेली “कुळवाडीभूषण” अथवा “बहुजन प्रतिपालक” हीच पदवी शिवरायांच्या जीवन कृर्तत्वाचे यथार्थ दर्शन घडवते हे स्पष्ट आहे.

:- डॉ. प्रकाश जी. पाटील,  (संदर्भ “प्रतिइतिहास” ले. चंद्रशेखर शिखरे)

 

Satyashodhak, obc, Mahatma phule, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, dr Babasaheb Ambedkar
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209