वडीगोद्री : अंतरवाली सराटी येथे ओबीसी आरक्षण बचाव समितीकडून ओबीसींच्या आरक्षणातील घुसखोरी थांबवा, ५८ लाख दिलेले कुणबी प्रमाणपत्र त्वरित रद्द करा, निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती रद्द करा, ओबीसी भटक्या विमुक्त विद्यार्थांना भेडसावणाऱ्या शैक्षणिक अडचणी दूर करा, ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला भरीव निधी द्या, आदी मागण्यासाठी सोनिया नगर अंतरवाली सराटी येथे सोमवार (ता. १) पासून उपोषण करण्यासाठीच्या परवानगी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मराठवाडा उपाध्यक्ष बाळासाहेब दखणे, नालेवाडी येथील बाबासाहेब बटुळे यांनी पोलिस अधीक्षक अजय बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी महाडीक जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांना भेटून शनिवारी (ता. ३०) निवेदन दिले आहे. बाबासाहेब बटुळे, आदिवासी कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे शेषराव शिनगारे, केकान यांचीही उपस्थिती होती.

फुले - शाहू - आंबेडकर