सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे लाक्षणिक उपोषण बुधवार दि. ३ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आयोजित केले आहे. तरी जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी, तालुकाध्यक्ष यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष भरत लोकरे यांनी केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी ओबीसींना दिलेला शब्द पाळावा. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावे. मराठ्यांचा समावेश ओबीसी आरक्षणात करू नये. या मागणीसाठी उपोषण करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. ओबीसी आरक्षणातून पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुका लढवून सदस्य, सभापती, सरपंचपदी विराजमान झालेल्या सर्व आजी - माजी सदस्यांनी हा लढा यशस्वी करण्यासाठी आंदोलनात सहभागी व्हावे.
Satyashodhak, obc, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
फुले - शाहू - आंबेडकर