नागपूर, २०२५: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील २७ टक्के आरक्षण कोट्यातून आरक्षण देण्याच्या कोणत्याही संभाव्य निर्णयाला नागपूर विभागातील ओबीसी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. यासाठी येत्या ३ सप्टेंबर २०२५ रोजी नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या सहा जिल्ह्यांमध्ये एकदिवसीय ‘इशारा आंदोलन’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर सरकारने मराठा समाजाच्या दबावाखाली ओबीसी आरक्षणाला धक्का लावला, तर नागपूर विभागात विराट मोर्चा आणि आमरण उपोषणासह तीव्र आंदोलन उभारण्याची तयारी ओबीसी संघटनांनी जाहीर केली आहे.

नागपूर येथे नुकत्याच झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत ओबीसी युवा अधिकार मंचासह विविध ओबीसी संघटनांनी एकत्र येऊन ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी रणनीती ठरवली. या बैठकीत सर्वांनी एकमुखी ठराव मंजूर केला की, मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून असंवैधानिक पद्धतीने आरक्षण देण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. “ओबीसींचे आरक्षण हा आमच्या चार दशकांच्या संघर्षाचा परिणाम आहे. आम्ही हा हक्क कोणत्याही परिस्थितीत हिसकावून घेऊ देणार नाही,” असे ओबीसी युवा अधिकार मंचचे मुख्य संयोजक उमेश कोर्राम यांनी ठामपणे सांगितले.
संघटनांनी खालील प्रमुख मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत:
या बैठकीला नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधील ओबीसी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये भंडारा, आमगाव, लाखांदूर, वडसा, सडक अर्जुनी, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा येथील प्रतिनिधींचा समावेश होता. उमेश कोर्राम यांनी सांगितले की, “आम्ही सरकारच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवून आहोत. जर ओबीसी आरक्षणाला धक्का लागला, तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू. यासाठी नागपूर विभागातून लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते एकत्र येतील.”
या आंदोलनाला अनेक सामाजिक आणि राजकीय नेत्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. बैठकीला खेमेंद्र कटरे, रोशन उरकुडे, गोपाल सेलोकर, अशोक लांजे, प्रभाकर वैरागडे, समीक्षा गणेशे, भूमेश शेंडे, सी.डी. चौधरी, श्रावण फरकाडे, मनोज चव्हाण, जयंत झोडे, तुळशीराम बोंद्रे, एस.आर. पडोळे, सुभाष पाल, पी.एम. समरीत, बादल कामबडी, डॉ. तेजस्विनी बेले, भाऊराव वंजारी, सुहास धमगाये, लोकमान्य बर्डे, चक्रधर पारधी, आशुतोष लांबट, तिलक खवास, राहुल तिखट, मनोज वानखेडे, कुलदीप सोनकुसरे, रमण शिवणकर, मनीष गिरडकर, धीरज भिशीकर, विकास चुटे, अमित हिंगणकर, कृतल आकरे, प्रतीक बावनकर, पियुष आकरे, शुभम तिखट, प्रतीक इंगळे, खेमराज मेंढे, संजीव भुरे, रवींद्र मानकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
“आमचे आंदोलन शांततापूर्ण असेल, पण जर सरकारने आमच्या मागण्या दुर्लक्षित केल्या, तर आम्ही नागपूरपासून मुंबईपर्यंत शक्तीप्रदर्शन करू,” असे उमेश कोर्राम यांनी जाहीर केले. ३ सप्टेंबरच्या ‘इशारा आंदोलन’ला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी ओबीसी समाजाला केले आहे. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर पुढील टप्प्यात मुंबईत विराट मोर्चा आणि आमरण उपोषण आयोजित करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
Satyashodhak, obc, dr Babasaheb Ambedkar, Mandal commission, Savitri Mata Phule
फुले - शाहू - आंबेडकर