श्रीहरी लॉन्स खामगाव येथे ओबीसी योजनांचे मार्गदर्शन कार्यक्रम
खामगाव राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा तसेच ओबीसी योजनांचे मार्गदर्शन श्रीहरी लॉन्स खामगाव येथे हजारोच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये पार पडले यावेळी अनेक पक्षाचे पदाधिकारी. लोकप्रतिनिधी, विविध समाज मंडळाचे अध्यक्ष, महाज्योती कार्यालयाचे अधिकारी, विद्यार्थी ओबीसी कर्मचारी शिक्षक पालक यांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमांमध्ये सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच महामानवांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये खामगाव मतदार संघाचे माजी आमदार दिलीपकुमारजी सानंदा, ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्वेसर्वा डॉ बबनरावजी तायवाडे साहेब राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिनजी राजुरकर साहेब, बजरंग दलाचे अमोलजी अंधारे, राष्ट्रीय ओबीसी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रकाशजी भागरथ, वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष शरद भाऊ वसतकार, बुलढाण्याच्या शिवसेना नेत्या जयश्रीताई शेळके महिला प्रदेशाध्यक्ष ज्योतीताई ढोकण, जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे, युवा जिल्हाध्यक्ष सुरजभाऊ बेलोकार रामकृष्ण जवकार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर साडेतीनशे गुणवंत विद्यार्थी उत्कृष्ट खेळाडू ओबीसी समाजातील शासकीय नोकरीला लागलेले विद्यार्थी व इतरांचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ बेलोकार यांनी तर सूत्रसंचालन अनिल मुलांडे सर अर्चनाताई जामोदे रविभाऊ महाले यांनी केले तर आभार प्रदर्शन जयेश भाऊ भिसे यांनी केले. कार्यक्रम आयोजनासाठी नीलकंठ सोनटक्के, पत्रकार योगेश हजारे, मेजर सुभाष फेरण, पत्रकार नितीन इंगळे, अनिल मुलांडे सर, रामविलास कुकडे, जयेश भिसे ओमप्रकाश वास्कर, अमीत फुलारे नसीम शाह, सुभाष इटनारे, संतोष अंबुस्कर, विलास वाशिमकर, दिनेश पतांगे, विष्णू भारसाकडे, मनोहर आखरे, केशव दुतोंडे, प्रतिक लोखंडकर, गजानन अहिर गजानन कराळे, रामेर्श्वर ठाकरे, बाळू ठाकरे, तहसीन शाह, रामकृष्ण कापडे, केशव दुतोंडे, शिवहरी रोहनकार ह. भ. प. निवृत्ती महाराज मांडवेकर, गजानन कराळे, दिपक महाजन यांनी परिश्रम घेतले.
मान्यवरांच्या प्रतिक्रिया -
१) ओबीसीच्या संविधानिक हक्क तथा अधिकारांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या या लढयात सामील होऊन ओबीसी समाजाच्या लढ्याला बळकटी द्या. अद्याप पर्यंत सुद्धा ओबीसी समाजाच्या हितासाठी, विकासासाठी आणि उद्धारासाठी अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा हा लढा संपूर्ण भारतभर लढण्याची आमची तयारी असून आम्ही तो लढा लढत आहो. डॉ. बबनरावजी तायवाडे, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ
२) ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी हा लढा लढायचा आहे. या लढ्याला मजबूती प्रदान करण्यासाठी ओबीसीच्या अधिकारीक लढाईसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघात सहभागी व्हा. आपला धडा आपण लदू या तत्वाला जागे व्हा. सचिन राजूरकर महासचिव, राष्ट्रीय ओबीसी महासंघ
३) ओबीसी समाज आपल्या हक्क आणि अधिकारांप्रती जागृत झालेला आहे. जोपर्यंत तो आपले संविधानिक हक्क आणि अधिकार मिळवणार नाही, तोपर्यंत थांबणार नाही. गणेश चौकसे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ
४) युवा हा विकासाचा लढ्याचा तथा परिवर्तनाचा कणा बोलल्या जातो. त्याच ओबीसी युवकांना मी युवा जिल्हाध्यक्ष या नात्याने आव्हान करतो की, या लढ्यात सामील होऊन लढ्याला बळकटी प्रदान करा. सुरज बेलौकार- युवा जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ
Satyashodhak, obc, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission