सांगली दि. ३ ऑगस्ट २०२५ विजयनगर सांगली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे सांगली जिल्ह्य़ातील पुरोगामी चळवळ च्या सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते यांची संविधान संरक्षण करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत बुद्ध, बसवांना, फुले,शाहू, आंबेडकर यांच्या आदर्श विचारांच भारतीय संविधान जपन्यासाठी आणि समाजातील तळागाळातील जनतेपर्यंत पोहचून समाज परिवर्तन घडवून आणण्याचा संकल्प करण्यात आला.
गौतम बुद्धानी इ. पूर्व काळात जगाला शांतता देणारा बुद्ध धम्म दिला तो कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकानी जगभर पसरवीला. पुढे बृहदरत यांची हत्या पुष्प मित्र शृंग याने करून सनातनी वैधीक धर्म प्रसारात आणला. या वैधिक व्यवस्थेला विरोध करून बाराव्या शतकात बसवणा यांनी बसव धर्म आणला. संत नामदेव,ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, कबीर यानी वारकरी संप्रदाय आणला.माणव प्राणी हा रानटी अवस्थेतून मानव बनला त्याच्यामध्ये माणुसकी आली माणसतल्या माणवतेला प्राधान्य देण्याचे विचार बुध्दांचे आहेत. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील न्युबिंणी येथे झाला
बौद्ध धम्म हा भारतातील श्रमण परंपरेतून उदयास आलेला एक प्राचीन धर्म आणि तत्त्वज्ञान आहे. ऐतिहासिक दृष्टिकोनातून हा मानवी मूल्यांचा पुरस्कर्ता, विज्ञाननिष्ठ आणि परिवर्तनशील धर्म मानला जातो. गौतम बुद्ध यांनी इ.स.पू. ६व्या शतकात बौद्ध धम्माची शिकवण दिली. सम्राट अशोक यांच्या काळात हा धर्म भारतभर पसरला आणि नंतर मध्य, पूर्व व आग्नेय आशियात प्रसारित झाला.
तथागत गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. ते तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक म्हणूनही ओळखले जातात. बुद्धांचे मूळ नाव सिद्धार्थ होते. शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन आणि राणी मायादेवी यांचा पुत्र त्यांचा जन्म लुंबिनी येथे झाला.बोधगया महाबोधी विहार, येथे बुद्धांना बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली गृहत्यागानंतर सिद्धार्थाने ज्ञानासाठी कठोर तपश्चर्या केली. बोधगया येथे निरंजना नदीकाठी पिंपळाच्या झाडाखाली ध्यान करताना त्यांना वैशाख पौर्णिमेला ज्ञानप्राप्ती झाली. त्यानंतर ते "बुद्ध" म्हणून ओळखले गेले. "बुद्ध" ही व्यक्ती नव्हे, तर ज्ञानाची अवस्था आहे. सारनाथ येथील धामेक स्तूप, येथे बुद्धांनी पहिला उपदेश दिला ज्ञानप्राप्तीनंतर बुद्धांनी सारनाथ येथे पाच शिष्यांना पहिला उपदेश दिला, ज्याला धम्मचक्रप्रवर्तन म्हणतात. या उपदेशात त्यांनी बौद्ध तत्त्वे मांडली आणि त्यांचे अनुयायी वाढले. सम्राट अशोक यांनी नंतर तिथे धामेक स्तूप बांधला.
विज्ञानात संशोधनाचे परिणाम सर्वत्र समान असतात. त्याचप्रमाणे, बौद्ध धम्माचे तत्त्वांचे पालन केल्यास त्याचे परिणाम सर्वत्र एकसमान असतात बुद्धांनी कर्म सिद्धांतावर भर दिला, दैव किंवा नशीब नाकारले. कर्मानुसार, कृतीनुसार फळ मिळते विज्ञानही कारण-कार्याच्या नियमावर आधारित आहे, .
बौद्ध धर्मातील अहिंसा, करुणा आणि प्राणिमात्रांविषयी सहानुभूती पाळली जाते.
बौद्ध धर्मात वैचारिक स्वातंत्र्याला प्रोत्साहन आहे. बुद्धांनी शिकवण तपासून स्वीकारण्यास सांगितले,तथागत बुद्धांनी जात, वर्ण किंवा सामाजिक दर्जा न पाहता समतेचा उपदेश केला.बौद्ध धर्माच्या तर्कनिष्ठ आणि कारण-कार्यावर आधारित शिकवणीमुळे लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला.
बौद्ध धर्मात करुणा, प्रामाणिकपणा, अहिंसा आणि क्षमाशीलता यांना महत्त्व आहे.
बौद्ध धर्माने विहारे आणि मठांना शिक्षण केंद्रे बनवले. तक्षशिला आणि नालंदा ही बौद्ध प्रभावातील विद्यापीठे प्रख्यात झाली.
बौद्ध धर्माने श्रीलंका, चीन, जपान, थायलंड, म्यानमार आदी देशांत भारतीय संस्कृतीचा प्रसार केला.
भारत देशातील बुद्धीवादी आणि भक्त मंडळी यांच्यात वैचारिक संघर्ष शिगेला पोहचला आहे.देशातील बुध्दीवादी वैचारीक जनता,पत्रकार देश हिताचा मार्ग स्वीकारत असून अंधभक्तानी उन्माद घातला आहे. देशातील ओबीसी,दलित, वंचित उपेक्षित वर्गात आपल्या मूळ बौद्ध धर्माकडे वेगाने वळत आहे. एवढेच नव्हे तर संपूर्ण जगाचा प्रवास युध्दाकडून बुद्धाकडे सुरू आहे.
या वैधिक व्यवस्थेला विरोध करून बाराव्या शतकात बसवणा यांनी बसव धर्म आणला. पुण्यातील पेशव्याईमुळे सनातनी ब्राम्हण समाजाने क्षुद्र वर्गावर क्रूर अन्याय करून गुलाम बनविले. यासाठी महात्मा फुले यांनी विरोध केला याकामी त्याना सावित्रीबाई फुले, उस्थाद लहुजी साळवे, उस्मान शेख, फाथीमा शेख, सदाशिव गोवंडे, तात्यासाहेब भिडे,सखाराम यशवंत परंजपे, मोरो विठ्ठल वाळवेकर, अण्णासाहेब चिपळूणकर, केशवराव भवळकर, अय्यवरू रामया वेंकया, नारायणराव गोविंदराव कडलक, कृष्णराव केळूसकर, गणेश अक्काजी गवई, दिनकरराव जवळकर, हरिभाऊ चव्हाण, नारायण मेघाजी लोखंडे यानी सहकार्य केले.
फुले यांनी समाज सुधारणा करण्यासाठी फार मोठे योगदान दिले ते केवळ एक सामाजिक कार्यकर्ते नव्हते तर एक प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि विचारवंत देखील होते. १९ व्या शतकात, जेव्हा समाज जात आणि लिंग भेदभावाशी झुंजत होता, तेव्हा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक न्याय, शिक्षण आणि समानतेसाठी निर्णायक चळवळ सुरू केली. आजही ज्योतिबा फुले यांचे जीवन आणि त्यांचे विचार समानता आणि सामाजिक सुधारणांसाठी काम करणाऱ्यांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांचे आदर्श स्वीकारण्याची प्रेरणा घेतली पाहिजे.
महात्मा ज्योतिराव फुले, एक महान समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि तत्वज्ञानी, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील वाईट प्रथांचे उच्चाटन करण्यासाठी समर्पित केले.
महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत:
विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्ऱ्य आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला.
राजर्षी शाहू महाराज यांनी यासाठी फार मोठे योगदान दिले आणि सत्यशोधक समाज चळवळ पुढे सुरू ठेवली त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सहाय्य केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध, कबीर आणि महात्मा फुले यांना गुरु स्थानी मानून त्या विचाराचे संविधान दिले असून ते अतिशय पवित्र संविधान असून समाजातील शोषक वर्गाला वंचित समाज घटकाचे शोषण करण्यासाठी अडथळा असल्यामुळे ते संविधान नष्ट करून मनुवाद आनन्यासाठी काम करीत आहेत हे त्यांचे मनसुभे उधळून लावण्यासाठी बुद्ध, बसावना, फुले, शाहू यांच्या चळवळील कार्यकर्ते सतर्क आहेत.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य बापूसाहेब माने, तर संतोष शिंदे, आनंदराव कांबळे,शिंगे सर, शिंदे ताई आदी मान्यवर उपस्थित होते.
Satyashodhak, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Buddhism