प्रचंड कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही. स्पर्धा परीक्षेची तयारी ही अकरावीपासून पहिल्या वर्षापासून करावे. आपण आपले स्वप्न मोठे ठेवा आणि ती पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत रहा. तुम्ही पाहिलेले स्वप्न निश्चितच सफल होते. तुम्ही ठरवलेले ध्येय यशस्वी होते. भारतामध्ये शिकून भारत मातेची सेवा करा त्यासाठी योग्य ट्रॅक निवडा." असे प्रतिपादन जेष्ठ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक दीपक अतिग्रे यांनी ओबीसी जनमोर्चा प्रणित राजर्षी शाहू करिअर गायडन्सच्या वतीने आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळाव्यात केले विद्या भवन या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी केले.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले "जीवनात यशस्वी होण्यासाठी खूप संधी असतात. परंतु योग्य मार्गदर्शना अभावी आपण ती संधी साधू शकत नाही. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता ओळखून मोठा अधिकारी होण्याचे बाळगावी आणि ते होण्यासाठी कोणता अभ्यास क्रम व अभ्यासाची पद्धत तज्ञांच्या कडून निश्चित करून घ्यावी आणि कठोर मेहनत करा तुमची शासकीय अधिकारी होण्याची ध्येयपूर्ती होतेच होते.
यावेळी परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती या विषयावर मार्गदर्शन करताना *ऑस्ट्रेलिया मधून सिव्हिल इंजिनिअरिंग एम एस पूर्ण* करून आलेल्या *समीक्षा लोहार* म्हणाल्या "केंद्र व राज्य सरकारच्या परदेशी शिक्षण साठीच्या स्कॉलरशिप आहेत. यासाठी आपण योग्य ती माहिती घेऊन ऑनलाईन अर्ज करावा लागतो.परदेशात एम एस करण्यासाठी नव्वद ते पंच्यान्नव लाख आणि एचडी करण्यासाठी सव्वा कोटी ते दीड कोटी एवढा निधी केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येक विद्यार्थ्याला दिला जातो. यासाठी विद्यार्थ्यांना जगभरात सुरू असणाऱ्या प्रथम दोनशे क्रमांकाच्या मानांकन असलेल्या विद्यापीठात प्रवेश मिळाल्याचे ऑफर लेटर ३१ जानेवारी पूर्वी मिळवून घ्यावे. फेब्रुवारी ते मार्च अखेर एप्रिल अखेर ऑनलाइन ऑनलाइन प्रवेश अर्ज परदेशी शिक्षणासाठी करावा लागतो. यानंतर बेसिक इंग्लिश ची परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा पास झाल्यानंतर शासनाचा निधी परदेशी विद्यापीठाकडे दिला जातो. आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थी फारच कमी संख्येने परदेशात जात असल्याने त्यांच्या रिक्त जागा मोठ्या प्रमाणावर असतात. इथून पुढच्या काळात त्या रिक्त राहणार नाहीत. यासाठी सर्वच विद्यार्थ्यांनी परदेशात शिकण्यासाठी मानसिकता करून करावी". अशी माहिती त्यांनी दिली.
या करिअर गायडन्स् कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सुरवातीला अहमदाबाद येथे काल झालेल्या दुदैवी विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
प्रास्ताविक करताना ओबीसी जनमोर्चाचे सरचिटणीस दिगंबर लोहार म्हणाले "गेली काही वर्षे आम्ही विद्यार्थी केंद्र बिंदू मानून शैक्षणिक प्रबोधनाचे कार्यक्रम राबवत आलो आहोत. याचे चांगले परिणाम समोर येत आहे काही मुलं उच्च शिक्षण घेऊन देशाबाहेरही शिक्षण घेऊन आपले व देशाचे नाव घेऊन करत आहेत याची आम्हाला समाधान आहे परदेशी शिक्षण आणि नोकरीच्या संधी स्पर्धा परीक्षा संधी दहावी बारावीनंतरच्या उच्च शिक्षणाच्या संधी वैद्यकीय शिक्षणातील संधी अधि विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करत असतो अशी माहिती त्यांनी दिली.
सुरवातीला उपस्थितांचे स्वागत संभाजीराव पोवार यांनी केले. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील ओबीसी चळवळीस सर्वोतोपरी मदत करणारे महावितरणचे अधिकारी प्रेमानंद मौर्य यांचा सत्कार ज्येष्ठ ओबीसी नेते सुभाष गुरव व पी.ए. कुंभार यांचे हस्ते तर रघुनाथ मांडरे सर यांचा सत्कार दिगंबर लोहार व पांडुरंग परीट यांच्या हस्ते तर कोल्हापूर जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात सक्षमतेने काम करणाऱ्या आणि ज्यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने *डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार* देऊन गौरविण्यात आले.त्या स्वातीताई काळे यांचाही सत्कार *शाल, गुलाब पुष्प* आणी डॉ.राजेंद्र कुंभार लिखित *शिक्षण संवाद तिरकस आणि चौकस* हे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राची परीट, प्रसाद नाळे, श्रावणी गुरव, संदीप गुरव, संज्योती गुरव, संगीता लोहार, वेदांत कांबळे चंद्रकांत कोवळे, सचिन सुतार, सुखदेव सुतार, जयंत शेडे, सम्राट सातार्डेकर, ज्ञानेश्वर सुतार, दिलीप लोखंडे, दिगंबर बारड, शिव समर्थ चौगुले, संजय सुतार, संभाजी भोसले, सौरभ कापसे, आदी विद्यार्थी पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री सुनील महाडेश्वर, किशोर लिमकर, अनिल खडके, चंद्रकांत कोवळे, मोहन हजारे, संजय काटकर , बाळासाहेब लोहार आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रूपाली सातार्डेकर यांनी केले तर आभार एकनाथ कुंभार यांनी मानले.
Satyashodhak, obc, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, dr Babasaheb Ambedkar
फुले - शाहू - आंबेडकर