साकोरी, ता. जुन्नर, जि. पुणे, दि. २५ मे २०२५: लोंढे मळा, साकोरी येथील जेतवन बुद्ध विहाराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा झाला. भगवान मथाजी उघडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयुष्यमान अशोक भगवान उघडे यांनी बांधलेल्या या विहाराच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाल्याचा हा प्रसंग बौद्ध बांधवांसाठी अविस्मरणीय ठरला. कार्यक्रमात पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण आयुष्यमान सुधाकर अभंग, व्याख्याते बी. एम. भालेराव, अभंग गुरुजी, अतिश उघडे, चंद्रकांत जावळे गुरुजी, नितीन साळवे, अध्यक्ष यशवंत गायकवाड, सरचिटणीस विजय वाघमारे, कोषाध्यक्ष आकाश भोजने, संघटक ख. रं. माळवे आणि सचिन भोजने यांच्या हस्ते सामूहिकपणे करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध पूजा, पाठ आणि पंचशील ग्रहणाने झाली. आयुष्यमान सुधाकर अभंग यांनी धम्म प्रवचनातून उपस्थितांना बौद्ध तत्त्वज्ञान आणि एकतेचा संदेश दिला. विशेष म्हणजे, आयुष्यमान अशोक भगवान उघडे यांच्या ‘माझे वंदन महापुरुषांना’ या कविता संग्रहाचे प्रकाशन प्रा. राजेंद्र सोनवणे, कवी बालाजी थोरात, सतीश कांबळे आणि राजकवी डॉ. ख. रं. माळवे यांच्या उपस्थितीत झाले. या कवितांनी बौद्ध समाजाच्या प्रेरणादायी इतिहासाला उजाळा दिला.
स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली, परंतु त्यापूर्वी उपस्थित मान्यवरांनी समाजाला एकजुटीने पुढे जाण्याचे आवाहन केले. यावेळी मच्छिंद्र कालेकर (चेअरमन), बाळकृष्ण साळवे (माजी सरपंच), सुरेश पानसरे, दादाभाऊ उबाळे, रामदास साळवे, तानाजी बागुल, बाळासाहेब भोजने, निवृत्ती साळवे, चंद्रकांत बनकर, अशोक शिंदे, मारुती विश्वासराव, शंकर विश्वासराव, रमेश साबळे, अश्विन पवार, गौतम कडलक, पांडुरंग बनकर, शिवाजी गोफणे, दिगंबर साळवे, देवराम पानसरे, रमेश उघडे, सागर उघडे, विनोद उघडे, विकी भोजने, शशिकांत पडवळ, पुनम दुधवडे, सुशीला गायकवाड, वैजंता पडवळ, वैशाली भालेराव, संगीता सोनवणे, चित्रा उघडे, उज्वला उघडे यांच्यासह अनेक बौद्ध बांधव उपस्थित होते.
हा सोहळा बौद्ध समाजाच्या एकतेचा आणि धम्माच्या प्रसाराचा प्रतीक ठरला. जेतवन बुद्ध विहार हे साकोरीतील बौद्ध बांधवांचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र बनले आहे.
Satyashodhak, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
फुले - शाहू - आंबेडकर