कोल्हापूर दि.१ जून - ओबीसी जनमोर्चा कोल्हापूरच्या वतीने आज दैवज्ञ समाज बोर्डिंग येथे ओबीसी मधील प्रज्ञावंतांचा सत्कार करण्यात आला ब्रेस्ट कॅन्सरवर केमोथेरपी ऐवजी पर्यायी व स्वस्त उपलब्ध असणारी बायोथेरेपी शोधून काढणाऱ्या संशोधक गीतांजली गुरव आणि परदेशात मास्टर डिग्री करण्यासाठी गेलेल्या समीक्षा लोहार तसेच नोटरी पदी निवड झालेल्या एड. स्नेहल गुरव यांचा सत्कार समारंभ पुर्वक करण्यात आला. संशोधक गीतांजली गुरव एडवोकेट सुमती पाटील. समीक्षा लोहार यांचा अर्चना गुरव यांच्या हस्ते तर एड.स्नेएड. स्नेहल गुरव यांचा सत्कार सौ संगिता लोहार तसेच ओबीसी जनमोर्चाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष शिवाजी माळकर ज्येष्ठ नेते सुभाष गुरव ओबीसी बहुजन आघाडीचे एकनाथ कुंभार, पंडित परीट, मोहन हजारे, आणि ओबीसी जनमोर्चाचे सरचिटणीस दिगंबर लोहार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संपन्न झाला.
यावेळी मार्गदर्शन करताना ओबीसी जनमोर्चाचे सरचिटणीस दिगंबर लोहार म्हणाले "आज पर्यंत ओबीसी मतपेटीची लढाई लढली नसल्याने ओबीसींच्यावर वारंवार सर्वत्र अडथळे निर्माण होत आहेत. या अडथळ्यांवर मात करण्यासाठी ओबीसींनी मतपेटीची लढाई लढली पाहिजे तरच ओबीसींना भारतीय संविधानाने दिलेले मानसन्मान आणि अधिकार मिळेल. यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींनी ओबीसी उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कंबर कसून कामाला लागावे. ओबीसींच्या मध्ये गुणवत्ता आहे, त्या गुणवत्तेचे कौतुक करणे हे ओबीसी जनमोर्चाचे काम आहे. ते काम चोखपणे पार पडत आहेत" याबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ नेते सुभाष गुरव यांनी ओबीसींच्या मध्ये प्रामाणिकपणा कष्ट करण्याची तयारी तसेच सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती असल्याने सर्व क्षेत्रात ओबीसी संधीचे सोने करत आहेत. परंतु त्यांना समाजाने पाठबळ देणे आवश्यक आहे.
यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉक्टर गीतांजली गुरव म्हणाल्या कॅन्सरबाबत खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत. आमच्या संशोधनातून ब्रेस्ट कॅन्सरवर केमोथेरपी ला पर्याय शोधला आहे. जर्मन सरकारने या पर्यायाला पेटंट दिले आहे. याचा उपयोग भविष्यात खूप होणार आहे."
यावेळी सत्काराला उत्तर देताना समीक्षा लोहार म्हणाल्या "शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन ओबीसी विद्यार्थ्यांनी परदेशी शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी आवश्यक ते सर्व मार्गदर्शन करण्यासाठी मी सदैव तयार आहे. आजचा सत्कारामुळे मी भारावून गेले आहे. एवढा मोठा ओबीसी समाज माझ्या मागे आहे, त्यामुळे माझे धाडस वाढले आहे.
एडवोकेट स्नेहल गुरव सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या "सर्व समावेशक पद्धतीने काम करत असल्यामुळे कमी वेळात कोणालाही न दुखवता व कायदेशीर रित्या योग्य असलेली कामे करत असल्याने मला संधी मिळेली. ज्या ठिकाणी कार्यरत आहे ते क्षेत्र अधिक व्यापकतेने करण्यासाठी या पुढे प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केले." तसेच यावेळी अर्चना गुरव, किशोर लिमकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
समारंभाचे अध्यक्ष शिवाजी माळकर सर म्हणाले "ओबीसी समाजातील नागरिकांनी त्यांच्या जाती, समाजाची ओळख घरातच ठेवून घरा बाहेर फक्त ओबीसी म्हणून वावरावे.तरच ओबीसींच्या भावी पिढ्यांचे भविष्याचे संरक्षण होवू शकेल. सन्मार्थ्यानी आपली क्षमता सिद्ध केली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपल्या पुर्ण क्षमतांचि वापर करून त्यांनी जे यश मिळवले त्याचा ओबीसींना अभिमान आहे.
युवा नेते सद्दाम मुजावर यांनी महाज्योती संस्थेच्या संशोधक विद्यार्थांची फेलोशिप बाबत होणारी फरफट सांगून ओबीसी एकते शिवाय ओबीसींना भविष्य नसल्याचे प्रतिपादन केले.
सुरवातीला उपस्थितांचे स्वागत ओबीसी जनमोर्चाचे उपाध्यक्ष मोहन हजारे यांनी केले. यावेळी सर्वश्री चंद्रकांत कोवळे, पंडित परीट, सुनील महाडेश्वर, आनंदराव सुतार, सतिष सुतार, शाहीन महात,गीता सुतार, हेमंत शिंदे, मधुकर सुतार, विलास सुतार, शिवाजी कदम, महादेव गुरव, मारूती सुतार, संदीप सुतार, दिपक गुरव, मारूती सुतार, मोहन पाटील ,विराज गुरव, प्रकाश सुतार, आदींसह ओबीसी माता,भगीणी, बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी आभार ओबीसी बहुजन आघाडीचे बाळासाहेब लोहार यांनी मानले.
Satyashodhak, obc, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission