कोल्हापूर दि.१२ जून सध्या महाराष्ट्रात इयत्ता दहावी व बारावी नंतरच्या पदविका अभियांत्रिकी, पॅरामेडिकल, कृषी विषयक पदविका अभ्यासक्रमाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. सदरच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 16 जून आहे. परंतु कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील बहुसंख्य त्यांचे विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले, नॉन क्रिमीलेअर दाखले, उत्पन्नाचे दाखले, ईडब्लूएस, एसइबीसी आदी आवश्यक दाखले मिळालेले नाहीत. सर्हर डाऊन किंवा अन्य कारणांमुळे दाखले मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पदविका अभ्यासक्रम शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना 16 जून पर्यंत दाखल न मिळाल्यास प्रवेश घेता येणार नाही. म्हणून महाराष्ट्र शासनाने सदरच्या केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेस किमान दहा दिवसाची मुदत वाढ मिळावी. अशी मागणी महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नाम. चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे करणारे निवेदन आज कोल्हापूरची निवासी जिल्हाधिकारी संजय तेली यांना ओबीसी बहुजन आघाडीच्या वतीने शासनास देण्यात आले आहे.

सदरच्या शिष्टमंडळात ओबीसी बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य दिगंबर लोहार कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष एकनाथ कुंभार शहराध्यक्ष अनिल खडके, किशोर लिमकर, संभाजीराव पवार, चंद्रकांत कोवळे, दत्तात्रय गुरव, अरुण कुंभार संजय काटकर, योगेश कुंभार, अजय अकोळकर आदीं कार्यकर्ते शिष्टमंडळात सहभागी झाले होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
फुले - शाहू - आंबेडकर