बस्तवडे, ता. कागल येथील बुद्ध विहारात तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा दहावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. 3 जून 2015 रोजी स्थापित झालेल्या या पवित्र मूर्तीच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील म्हाकवेकर आणि सदानंद शिंदे यांनी बुद्ध मूर्तीला पुष्पहार अर्पण केला, तर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यांना आयु. लक्ष्मी संजय कांबळे, सौ. शारदा कांबळे, प्रियांका कांबळे, निकिता कांबळे आणि नीलम कांबळे यांनी हार अर्पण केले. सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच साताप्पा कांबळे यांनी मेणबत्ती प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
नम्रता कांबळे यांनी बुद्ध वंदना, त्रिशरण आणि पंचशील सामुदायिकपणे घेतले, ज्यामुळे वातावरण भक्तिमय झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष साताप्पा कांबळे यांनी सांगितले की, “हा बुद्ध विहार गावातील सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. गेल्या दहा वर्षांत बौद्ध समाजातील सर्वांनी दिलेले सहकार्य आणि धम्मदान यामुळे हा सोहळा शक्य झाला.” त्यांनी आयु. पुंडलिक श्रावण कांबळे, शरद पुंडलिक कांबळे, हरी अंतू कांबळे, पांडुरंग बळवंत कांबळे आणि लक्ष्मण बळवंत माने यांच्या मूर्ती स्थापनेसाठीच्या योगदानाबद्दल विशेष आभार मानले.
यावेळी नम्रता कांबळे, आर्या कांबळे, श्रीनिधी माने आणि समीक्षा माने यांनी डॉ. आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्यावर आधारित प्रेरणादायी गीते सादर केली, ज्याने उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रमाला श्रेया कांबळे, प्राजक्ता कांबळे, रिया कांबळे, अक्षता कांबळे, मथुरा कांबळे, संगीता कांबळे, प्रियांशी कांबळे, समृद्धी शिंदे, अपूर्वा शिंदे, ध्रुवा कांबळे, नारायणी वराळे, रणवीर खोडे, रुद्राक्ष कांबळे, पार्थ कांबळे, सिद्धार्थ कांबळे, ऋतुराज कांबळे, वेदांत कांबळे आणि इतर लहान बंधू-भगिनी उपस्थित होते. आयु. प्रियांका सुखदेव कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले, तर साताप्पा कांबळे यांनी सर्वांना खाऊ वाटप केले.
dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Buddhism