कोल्हापूर : ज्या बलुतेदार,आलुतेदार समाजातील लोकांनी लढून मिळवलेल्या आरक्षणाचा लाभ खऱ्या ओबीसी घटकांना मिळवण्यासाठी ओबीसी समाजाने आपली जात घरात ठेवून ओबीसी म्हणून वावरावे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खरा ओबीसी प्रतिनिधी सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीत उभा करावा जर असे झाले नाही तर खरा ओबीसी निवडून आणण्यासाठी ओबीसी समाज प्रयत्न करणार" असा निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षात काम करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांची व्यापक बैठक देवांग कोष्टी समाजाच्या चौंडेश्वरी सभागृहात ओबीसी जनमोर्चा आयोजित केलेल्या सभेत उपस्थित ओबीसींनी एकमुखाने घेतला.
यावेळी मार्गदर्शन करताना ओबीसी जनमोर्चाचे सरचिटणीस दिगंबर लोहार म्हणाले "आपल्या पूर्वजांनी आपले सामाजिक शैक्षणिक व आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी आरक्षण मिळावे. यासाठी खूप मोठी लढाई करून आरक्षण मिळवले आहे. ते टिकवण्याची जबाबदारी आपल्या पिढीवर आहे. त्यासाठी आपण ओबीसी म्हणून संघटित होऊन ओबीसींमध्ये होणाऱ्या धनदांडग्या व सवर्णांच्या घुसखोरी बाबत आवाज उठवला पाहिजे. खऱ्या ओबीसींना प्रतिनिधित्व मिळालेच पाहिजे यासाठी पक्ष भेद बाजूला ठेवून आपण काम केले पाहिजे."असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी ओबीसी चे ज्येष्ठ नेते शिवाजी माळकर "यांनी प्रत्येक समाजाने आपापल्या समाजाची जनगणना करावी असे मत मांडले." ज्येष्ठ नेते सुभाष गुरव "ओबीसी समाजाने इतर ओबीसी बांधव बांधवांना सहकार्य करून सामाजिक एकोपा जपण्याचे आवाहन केले". संभाजी पवार म्हणाले "ओबीसी एकत्र आले तर देशाचे व राज्याचे राजकारण लोकाभिमुख होणार आहे."
या कार्यक्रमास अमृत सुतार, किशोर लिमकर, संतोष माळी राहुल माळी, एकनाथ कुंभार, सुभाष माळी, चंद्रकांत कोवळे, प्रदीप यादव, अजय अकोलकर, संजय काटकर, शौकत शिगावे, तुकाराम लोहार, किसन कल्याणकर, पांडुरंग परीट, आदींसह ओबीसी बांधव उपस्थित होते.
सुरुवातीला उपस्थित यांचे स्वागत ओबीसी बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष एकनाथ कुंभार यांनी केले या बैठकीचे अध्यक्षस्थानी देवांग कोष्टी समाजाचे उपाध्यक्ष मोहन हजारे होते. शेवटी आभार पंडित परीट यांनी मानले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission