कोल्हापूर - कौशल्य आणि विविध देशातील भाषा अवगत केल्यास जगात शिक्षण व नोकरीच्या संधींची कमतरता नाही. पण यामध्ये मराठी तरुण मागे आहे. मराठी तरुणांनी याकडे वळावे, असे आवाहन करत आंबेडकर 'राईट एज्युकेशन ग्रुप यासाठी सहकार्य करेल, असे प्रतिपादन आंबेडकर राईट एज्युकेशन ग्रुपचे संचालक भूषण रामटेके यांनी केले. ओबीसी जन मोर्चा प्रणित राजर्षी छत्रपती शाहू करिअर गायडन्स तर्फे आयोजित परदेशातील शिक्षण व नोकरीच्या संधी या विषयावर रामटेके बोलत होते. शिवाजी पार्कतील विद्या भवन येथील राजर्षी शाहू सभागृहात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी. प्राचार्य शिवाजीराव माळकर होते.
भूषण रामटेके म्हणाले, परदेशात शिक्षण आणि नोकरीच्या संधींची उपलब्धता आहे. पण योग्य मार्गदर्शनाअभावी . येथील तरुण तिथपर्यंत पोहोचत नाहीत. महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था भारतात अतिशय चांगली आहे. मात्र इंडस्ट्रीला लागणारे मनुष्यबळ घडवले जात नाही. त्या प्रकारचा शैक्षणिक अभ्यासक्रम फारसा सक्रियपणे राबवला जात नाही. .
परदेशातही विद्यार्थ्यांना अत्यल्प पैशात उच्च दर्जाचे शिक्षण घेता येते असे सांगत परदेशात त्या त्या शासनाच्या शिष्यवृत्ती व फ्री शिप मिळतात, याबाबत सखोल मार्गदर्शन केलें. प्रश्नोत्तराच्या वेळेत रामटेके यांनी फिजिओथेरपी, वैद्यकीय क्षेत्र, नर्सिंग, फार्मसी या अभ्यासक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी भूषण रामटेके यांचा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची मूर्ती, शाल आणि डॉ. राजेंद्र कुंभार लिखित शिक्षण संवाद तिरकस आणि • चौकस हे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुजुमदार आणि दिगंबर लोहार यांनी परदेशी शिक्षण व उच्च शिक्षण यातून मुलांचे करिअर याबाबतचे अनुभव व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव माळकर . यांनीही मनोगत. व्यक्त केले.
या कार्यक्रमात रोहन एकशिंगे, तुषार गजरे, वैभव कोलेकर, वैष्णवी पाटील. नेहा शेडे, दिनेश अकोलकर, दिलीप लोखंडे, विनय गजरे, सानिका भुरके, प्रिया भुरके, नेहा भुरके, सौरभ फडणीस, अनिल खडके उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर सुतार यांनी केले, तर आभार सद्दाम मुजावर यांनी मानले.
Satyashodhak, obc, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, dr Babasaheb Ambedkar, Bahujan