पेण 25 एप्रिल 2025 रोजी दिग्दर्शक अनंत महादेवन यांचा 'फुले' हा चित्रपट जगभरात प्रसिद्ध झाला. या चित्रपटासाठी प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. हा चित्रपट अधिकाधिक लोकांना पाहायला मिळावा यासाठी तो चित्रपट आपल्या महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्यात यावा अशी राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल नाचपल्ले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी आहे.
महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी तसेच दिन दलित उद्धारासाठी महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये एक क्रांती केलेली आहे. त्यांच्या कार्याचा प्रभाव इतका मोठा आहे की जसा 19 व्या शतकात त्याना विरोध झाला तितकाच विरोध २१ व्या शतकातही या चित्रपटाला झालेला पाहायला मिळाला. परिणामी चित्रपटातील जवळपास 12 सीन्स सेन्सार बोर्डाने कमी केले. परंतु म. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांच योगदान आणि विचार यामुळे तोकडे पडणार नाहीत. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्यासाठी लढणाऱ्या दांपत्याचा हा संघर्षप्रवास प्रत्येकाने पाहायला हवा. चित्रपटातून आपल्याला समाज उन्नतीसाठी उभारलेल्या चळवळीचा जीवनप्रवास पाहायला मिळतो. त्यामुळे आमची आपणास विनंती आहे की "फुले" चित्रपट टॅक्स फ्री करत अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परिवर्तनवादी, पुरोगामी महाराष्ट्र घडवणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान झाला पाहिजे. आपल्या गौरवशाली इतिहासाचा ठसा प्रत्येकाच्या मनात उमटला पाहिजे. आपण या सर्व महामानवाना अभिप्रेत असलेली समाजरचना निर्माण करण्यात निश्चितच योगदान देत आहात याची आम्हाला पूर्णपणे कल्पना आहे. बहुजन समाजातील लोकांना आजही शिकण्यासाठी अडचणी आहेत. त्यामुळे शिक्षणाचे महत्व आजच्या पिढीला कळावे यासाठी हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये टॅक्स फ्री करण्यासाठी आपण योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी आपणाकडे राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाची विनंती आहे.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Savitri Mata Phule