मोदी सरकारने देशात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल देशातील समस्त ओबीसी समाजाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभार मानले जात आहेत. हा अतिशय क्रांतिकारी निर्णय असून स्वातंत्र्योत्तर भारतात प्रथमच जातनिहाय जनगणना होणार असल्याने बीड जिल्हा समता परिषदेने येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाता फुले यांच्या पुळ्याजवळ फटाके वाजवून आणि पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी १९९२ पासून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून सातत्याने विविध आंदोलने आणि पाठपुरावा करण्यात आलेला आहे. दिल्ली, पटना, राजस्थान, हजारीबाग, सतना, भोपाळ, गोवा, हैदराबाद आदी ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महामेळाव्यामध्ये माननीय छगनराव भुजबळ साहेबांनी देशातील ओबीसींची जात निहाय जनगणना व्हावी अशी जोरदार मागणी केली होती. २०१० मध्ये जातनिहाय जनगणना करण्यासाठी समता परिषद सुप्रीम कोर्टामध्ये गेली होती, त्याचवेळी तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांच्या माध्यमातून संसदेत जोरदारपणे ही मागणी मांडली. त्यावेळी माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. त्यानंतर देशाभरातील तब्बल १०० खासदारांचा भक्कम पाठिंबा मिळाला. या पाठपुराव्याचा परिणाम म्हणून तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री स्व. प्रणव मुखर्जी यांनी जातनिहाय जनगणनेची घोषणा केली. परंतु तेव्हा नगरविकास व ग्रामविकास खात्यामार्फत केवळ सर्वेक्षण करण्यात आले. नंतरच्या काळात देशात मोदी सरकार आल्यानंतर पुन्हा या मागणीसाठी ओबीसीचे नेते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ साहेब यांनी पाठपुरावा सुरु केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देखील पत्राद्वारे, तसेच व्यक्तिगतरीत्या ही मागणी मांडली होती. आता संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना होणार असल्याने ही संपूर्ण देशातील सर्व प्रवर्गातील मागास घटकांसाठी आनंदाची बाब आहे. जेव्हा जेव्हा ओबीसींना काही देण्याची वेळ येते, तेव्हा त्यांना त्यांची संख्या विचारली जाते. त्यामुळे महाराष्ट्रात तब्बल ३७४ जातींचा मोठा समूह असलेल्या ओबीसी प्रवर्गाला आहे त्या आरक्षणाचाही पुरेसा लाभ मिळालेला नाही. या प्रवर्गातील अनेक दुर्लक्षित जातसमूह अद्याप विकासापासून वंचित आहेत. ओबीसींसह अन्य सर्व जातसमूहांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात योग्य आरक्षण मिळण्यासाठी, सर्व समाजघटकांची खरी संख्या समजण्यासाठी आणि त्यांना हक्काचा वाटा मिळवून देण्यासाठी जातनिहाय जनगणना अतिशय गरजेची आहे. जातनिहाय जनगणना झाल्यानंतर सर्वच प्रश्न सुटतील आणि गेल्या अनेक वर्षांपासून विविध क्षेत्रात ओबीसींचा असलेला बॅकलॉग भरून काढण्यासह सर्वांना योग्य न्याय मिळेल. त्यामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत देशातील तमाम ओबीसी मानवांच्या वतीने करण्यात येत आहे.
बीड जिल्हा समता परिषदेच्या वतीने या निर्णयाचे स्वागत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाता फुले यांच्या पुळ्याजवळ फटाके वाजवून आणि पेढे वाटून करण्यात आले. यावेळी समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस तथा बीड जिल्हाध्यक्ष ॲड. सुभाष राऊत, परीट समाजाचे नेते गणेश जगताप, माळी महासंघाचे नेते प्रा. लक्ष्मण गुंजाळ, सोनार समाजाचे नेते ॲड. संदीप बेदरे, धनगर समाजाचे नेते रणजीत सोन्नर, समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन साखरे, शहराध्यक्ष निखिल शिंदे, युवा नेते नितीन राऊत, माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष धनंजय काळे, जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अजिंक्य सुरवसे, मोहनराव गोरे, महेश व्यवहारे, निलेश राऊत, पांडुरंग सत्वधर, अजय काळे, रोहित जमदाडे, मंगेश जमदाडे, महेश चौधरी आदींसह समता सैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission