आखाडा बाळापूर- दि.26/04/2025 राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाच्या जिल्हा कार्यकारिणी निवड सभा आखाडा बाळापूर येथे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल नाचपल्ले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेमध्ये संघटनेचे मार्गदर्शक माजी शिक्षक आमदार श्री.बाळाराम पाटील साहेब, संघटनेचे कायदेशीर सल्लागार तथा राज्य मागासवर्गीय आयोग महाराष्ट्र राज्याचे माजी सदस्य आदरणीय बी.एल. सगर किल्लारीकर साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल नाचपले प्रदेश सरचिटणीस संतोष भोजने यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणीची सभा होऊन यामध्ये लहू राक्षे यांची संघटनेच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी, तर सरचिटणीस म्हणून रमेश चव्हाण, राज्यप्रसिद्धी प्रमूख सचिन गडपतवार यांच्यासह जिल्हा कार्याध्यक्ष राहुल राठोड, जिल्हा कोषाध्यक्ष शिवराज इन्द्रे, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश बेनगर, गंगाधर सोनटक्के, श्रीमती सुमनताई केंद्रे, सोनटक्के सर, महिला जिल्हा प्रतिनिधी सुमन केंद्रे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख प्रशांत सेवनकर, सहचिटणीस गणपती हिरवे तालुका अध्यक्ष हिंगोली आशिष गावंडे तर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.. सदर कार्यक्रमात ओबीसी नेते श्री सुभाष जिरवणकर सर यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला. या निवडीबद्दल जिल्हाभरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..
तसेच जिल्हामध्ये तालुका निहाय शाखा काही कालावधीतच गठीत करू असे लहू राक्षे आपल्या भाषणात म्हणाले.. संघटना ही बहुजन हितासाठी कटिबद्ध असून बहुजनांच्या, विध्यार्थ्यांना, शिक्षकांना आपल्या संविधानिक मागण्यासाठी खुले व्यासपीठ म्हणून काम करणार असल्याचे व बहुजनांच्या संघर्षासाठी, न्यायासाठी बहुजनांचे शिक्षण वाचवण्यासाठी संघटनेमध्ये सर्वांनी सक्रियपणे सहभाग नोंदवावा असे प्रदेश सरचिटणीस संतोष भोजने म्हणाले.. आपली संघटना श्रमिक संघाकडे नोंदणीकृत असून महाराष्ट्र मधील सर्व जिल्ह्यांमध्ये संघटना शाखा स्थापन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून राज्यातील सर्व ओबीसी बहुजन शिक्षकांनी संघटनेचे पद घेऊन संघटनेचे कार्य करावे असे आवाहन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल नाचपल्ले यांनी केल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा सूत्रसंचालन सचिन गडपतवार यांनी केले तर आभार प्रदर्शन लहू राक्षे यांनी मानले.. सभेला राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल नाचपल्ले, राज्यसरचिटणीस संतोष भोजने, ओबीसी नेते लहू राक्षे, रमेश चव्हाण, सचिन गडपतवार, गणपती हिरवे, आशिष गावंडे, प्रशांत सेवणकर सोनटक्के सर, शिवराज इन्द्रे, अविनाश बेनगर, राहुल राठोड, स्वप्निल शेटे, कोल्हे सर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Satyashodhak, obc, dr Babasaheb Ambedkar, Bahujan