तुळजापूर - दि. 20/04/2025 राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाच्या जिल्हा कार्यकारिणी निवड सभा तुळजापूर येथील पंचायत समिती सभागृहात पार पडली. या सभेमध्ये संघटनेचे मार्गदर्शक माजी शिक्षक आमदार श्री.बाळाराम पाटील साहेब, कायदेशीर सल्लागार राज्य मागासवर्गीय आयोग महाराष्ट्र राज्याचे माजी सदस्य आदरणीय बी.एल. सगर किल्लारीकर साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल नाचपले प्रदेश सरचिटणीस संतोष भोजने यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणीची सभा होऊन यामध्ये अनंत फुलसुंदर यांची संघटनेच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली..या निवडीबद्दल जिल्हाभरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ओबीसी बहुजन शिक्षक संघाच्या जिल्हा निहाय शाखा तयार होत असताना धाराशिव जिल्ह्याला हा पहिला मान मिळाला याबद्दल धाराशिव वासियांनी संघटनेचे आभार मानले. तसेच जिल्हामध्ये तालुका निहाय शाखा काही कालावधीतच गठीत करू असे नूतन जिल्हाध्यक्ष अनंत फुलसुंदर आपल्या भाषणात म्हणाले.. संघटना ही बहुजन हितासाठी कटिबद्ध असून बहुजनांच्या,विध्यार्थ्यांना, शिक्षकांना आपल्या संविधानिक मागण्यासाठी खुले व्यासपीठ म्हणून काम करणार असल्याचे व बहुजनांच्या संघर्षासाठी, न्यायासाठी बहुजनांचे शिक्षण वाचवण्यासाठी संघटनेमध्ये सर्वांनी सक्रियपणे सहभाग नोंदवावा असे प्रदेश सरचिटणीस संतोष भोजने म्हणाले.. आपली संघटना श्रमिक संघाकडे नोंदणीकृत असून महाराष्ट्र मधील सर्व जिल्ह्यांमध्ये संघटना शाखा स्थापन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून राज्यातील सर्व ओबीसी बहुजन शिक्षकांनी संघटनेचे पद घेऊन संघटनेचे कार्य करावे असे आवाहन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल नाचपल्ले यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा सूत्रसंचालन सुखदेव भालेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष भोजने यांनी मानले..सभेला राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल नाचपल्ले, राज्यसरचिटणीस संतोष भोजने,राज्य उपाध्यक्ष सुखदेव भालेकर, राज्य सल्लागार अभय पाटील,लातूर जिल्हाध्यक्ष हिरालाल पाटील, ओबीसी लढवय्ये दयानंद जवळगावकर, हर्षवर्धन माळी, सोमनाथ जामगावकर, दिगंबर हुंडेकरी, आण्णा दळवी, सुरेश राऊत, सचिन राऊत, अशोकराव खडके,पंकज काटकर, अशोक चव्हाण, ज्योतिर्लिंग क्षीरसागर,आदी पदाधिकारी उपस्थित होते..
obc, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission