ग्रामपंचायत बस्तवडे ता. कागल येथे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती साजरी करण्यात आली. सुरुवातीस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजन सरपंच सौ. सुनिता गंगाधर शिंत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.तर या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते साताप्पा कांबळे यांनी केले. यावेळी त्यांनी जयंतीनिमित्त सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन केले. व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती दिली. तर यावेळी ग्रामपंचायत सदस्य जयवंत पाटील व सोसायटी संचालक शरद नरके यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती विषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सदाशिव वायदंडे, प्रकाश शिंदे , गंगाधर शिंत्रे, मा.सैनिक धीरज पाटील, सुमित वांगळे , अमर सुतार, व सातापा नरके इत्यादी हजर होते. शेवटी सर्वांचे आभार ग्रामसेविका सौ. सुविधा पाडलेकर मॅडम यांनी मांडले.