मा.रामदासजी तडस, माजी खासदार,वर्धा लोकसभा
आपल्याला रामनवमीच्या दिवशी देवळी येथील राम मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यापासून तेथील पुजाऱ्याने अडविल्याची बातमी सर्वत्र पसरलेली आहे.आपण स्वतःही त्याबद्दल प्रसार माध्यमांना सांगितले असून आपला संताप व्यक्त केला आहे.सध्या आपल्या देशात हिंदू राष्ट्राचे वारे जोरात वाहत आहे.त्याची ही चाहूल आहे.आमचा बहुजन समाज हिंदू राष्ट्र कधी घोषित होते हे पाहण्यासाठी प्रचंड कासावीस झाला असून त्यासाठी तो भाजपा करिता काहीही करायला तयार आहे.विशेषतः आमचा ओबीसी, मराठा वर्ग तर हिंदू राष्ट्राच्या उभारणीसाठी इतका उतावीळ आणि आतुर झाला आहे की, त्याने स्वतःच्या मेंदूने विचार करणे पूर्णतः बंद केले आहे.भाजपाने निर्माण केलेल्या चक्रव्युहात तो अशा प्रकारे फसलेला आहे की त्यातून बाहेर पडणे आता त्याला शक्य नसून छत्रपती शिवाजी महाराज आणि आमच्या समस्त महापुरुषांच्या अपमानाचेही त्याला आता काहीच दुःख होत नाही.कारण आपल्या डोक्यात मेंदू नावाची विचार करणारी काही गोष्ट आहे हेच तो विसरला आहे.तुमच्या अपमानाने त्याचे बंद डोळे थोडे फार उघडतील अशी अपेक्षा करणे सुद्धा आता व्यर्थ झाले आहे.तडस साहेब,भारताने लोकशाही व्यवस्था स्वीकारली असल्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षात काम करणे चुकीचे नाही.परंतु एखादा पक्ष जर सतत आपल्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात इतर धर्माविरुद्ध द्वेषाची पेरणी करीत असेल आणि दुसऱ्या धर्मियांविरुद्ध आपल्या कार्यकर्त्यांना खोटेनाटे सांगून सतत पेटवत ठेवत असेल तर तो त्या कार्यकर्त्यांप्रमाणेच देशाला सुद्धा विनाशाकडे नेण्याचा मार्ग आहे असे समजावे.
मा.तडस साहेब, एकीकडे जग वेगवेगळ्या ग्रहांवर वस्ती करण्याचे प्रयत्न करीत आहे आणि दुसरीकडे आमच्या देशात जाती-धर्मावरून मंदिरातील प्रवेश ठरतो आहे.ज्या देशात 80 टक्के लोकसंख्या हिंदूंची आहे, त्या देशाला पुन्हा आणखी हिंदू राष्ट्र कशासाठी बनवायचे आहे ? ते हिंदू राष्ट्र नसून केवळ ब्राह्मण राष्ट्र असणार आहे व त्यामध्ये संविधान हा देशाचा ग्रंथ राहणार नसून मनुस्मृतीच्या नियमानुसार देशाचा कारभार चालणार आहे.त्यात बहुजन समाजातील तुमच्यासारख्या प्रतिष्ठित लोकप्रतिनिधीपासून तर सर्वसामान्य माणसापर्यंत सर्वांना अतिशय हीन,दीन आणि जनावरापेक्षाही वाईट वागणूक मिळणार आहे.त्याचा अनुभव तुम्ही स्वतः नुकताच घेतलेला आहे.भारताच्या सर्वोच्च पदावर असलेल्या राष्ट्रपतींनाही वेळोवेळी त्याचा अनुभव आलेला आहे.तरीसुद्धा आमचा बहुजन समाज अजूनही भाजपाच्या जात्यांध मनुवादी विचारसरणीला डोक्यावर घेऊन नाचत असेल तर ब्राह्मणांचे वर्चस्व असलेले आणि बहुजन गुलाम असलेले हिंदू राष्ट्र निर्माण व्हायला फार वेळ लागणार नाही.
सन्माननीय तडस साहेब, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात 2025 मध्ये जर माणसाची लायकी आणि मंदिर प्रवेश त्याच्या जातीवरून ठरत असेल तर भारताने महासत्ता होण्याच्या गप्पा अजिबात मारू नये. ज्या देशात रात्रंदिवस हिंदू-मुस्लिम यावर चर्चा घडवून आणली जाते आणि लोकांचे जगण्या-मरण्याचे मूलभूत प्रश्न बाजूला ठेवले जातात तो देश कधीच महासत्ता होत नसतो. उलट आम्ही आमच्या देशाला अफगाणिस्तान सारखे कट्टरवादी तालिबानी राष्ट्र करण्याच्या समीप आलेलो आहे हे लक्षात घ्यावे.अशा तालिबानी हिंदू राष्ट्रात आमच्या बहुजन हिंदू स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार राहणार नाही,आम्ही मंदिरात प्रवेश करू शकणार नाही आणि ज्याप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,शाहू महाराज,अण्णाभाऊ साठे यासारख्या अनेक महापुरुषांचा इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने वेळोवेळी घोर अपमान केला; तसाच अपमान पुन्हा आता येथील बहुजनांना सहन करावा लागणार आहे.तुमचा झालेला घोर अपमान हे त्याचेच लक्षण आहे व ही मनुस्मृतीची सुरुवात आहे.
मा.तडस साहेब,बहुजनांना समजावून सांगणारे अनेक महापुरुष या देशात होऊन गेले,पण आम्ही त्यांनाच मूर्खात काढले.जिवंतपणी त्यांना प्रचंड त्रास दिला,विरोध केला. नंतर मात्र त्यांचे पुतळे उभारून जयजयकार सुरू आहे.परंतु त्यांचा एकही विचार आम्हाला मान्य नसून बहुजन विरोधी मनुवादी विचारांचे आम्ही कट्टर वाहक बनलो आहे.त्यामुळेच तुमच्यासारख्या खासदार राहिलेल्या लोकप्रतिनिधीला एका अडानचोट आणि भिकारचोट पुजाऱ्याकडून जाहीर अपमान सहन करावा लागतो.हा अपमान तुमचा एकट्याचा नसून समस्त बहुजन समाजाचा आहे.त्यामुळे आम्हाला प्रचंड वेदना झाल्या असून दुसरीकडे आपल्यासारखे उच्चपदस्थ लोक अजूनही मनुवादी विचारसरणीवर डोळे बंद करून का विश्वास ठेवतात याचा प्रचंड खेद सुद्धा वाटतो. त्यामुळेच तुम्हाला मंदिर प्रवेश नाकारल्यानंतर अनेकांनी निषेध व्यक्त करताना भाजपमधील बहुजनांना अशी शिक्षा मिळालीच पाहिजे अशा संतापजनक भावना सुद्धा व्यक्त केलेल्या आहे.
मा.तडस साहेब,आपल्यासारख्या बहुजन लोकप्रतिनिधींनी कोणत्याही पक्षात रहा,परंतु त्या ठिकाणी राहून अशा प्रकारचा भेदभाव,कट्टरवाद, जातीयवाद,अपमान सहन न करता त्या विरोधात पक्षात राहूनच जगद्गुरु तुकोबांच्या गाथा जिवंत करणाऱ्या संताजी जगनाडे महाराजांच्या स्वाभिमानी बाण्याने आपण उठाव केला पाहिजे असे आपणास सुचवावेसे वाटते.अन्यथा वेळोवेळी आपल्यासारख्या लोकांचा अपमान होतच राहील आणि आम्ही नुसते मुकाट्याने ते सहन करत राहू.असे जर झाले तर येणाऱ्या काळात पेशवाई प्रमाणे बहुजनांच्या गळ्यात मडके आणि कमरेला झाडू बांधण्याचे दिवस फार दूर नाही हे आपण समजून घ्यावे.मंदिरांच्या जागा आमच्या,मंदिर बांधकामाचा पैसा आमचा, सर्व मेहनत आमची आणि मंदिर उभे झाल्यानंतर पुजारी मात्र ब्राह्मण ! आणि आमच्या पैशावर जगणारा तो पुजारी आमचाच अपमान करणार ! यावर आपण सर्वांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे.म्हणूनच महात्मा फुलेंनी देव आणि भक्त यामध्ये दलाल नको हे सांगितले होते.तेव्हा एक बहुजन लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या झालेल्या अपमानाचा आम्ही जाहीर निषेध करीत असून आपण आपल्या पक्षश्रेष्ठींना याचा जाब विचारावा व पक्षात राहूनच बहुजनांच्या हक्कासाठी व स्वाभिमानासाठी जोरदार आवाज उठवावा ही आपणास नम्र विनंती.
आपला हितचिंतक
प्रेमकुमार बोके, अंजनगाव सुर्जी
Satyashodhak, obc, dr Babasaheb Ambedkar, Bahujan