लातूर - भीम आर्मीच्या संस्थापक खासदार भाई चंद्रशेखर आजाद, राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनयरतन सिंह आणि राष्ट्रीय महासचिव अशोक भाऊ कांबळे यांच्या कार्याने प्रेरित होऊन, भीम आर्मीच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक आणि मराठवाड़ा निरीक्षक अक्षय धावारे, तसेच मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे यांच्या उपस्थितीत दि. १३ मार्च २०२५ रोजी हसाळा तालुका, औसा येथे भीम आर्मीच्या नवीन शाखेचे अनावरण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडले.
या कार्यक्रमात जिल्हा उपाध्यक्ष विशाल पोटभरे, जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवळे, जिल्हा सचिव बबलू शिंदे, औसा जिल्हा संघटक समाधान कांबळे, तालुका अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, तालुका सचिव प्रभाकर कांबळे, तालुका उपाध्यक्ष पंढरीनाथ धुमाळ, तालुका प्रसिद्धीप्रमुख बाबासाहेब गरड, भादा सर्कल प्रमुख अमोल उबाळे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव वाघमारे, तालुकाध्यक्ष मोतीराम कांबळे, माजी शहर अध्यक्ष अजय टेकांळे, शहर कार्याध्यक्ष परमेश्वर ताकपिरे, यश सोनवणे, शिव भीम प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबा ढगे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी हसाळा शाखेच्या अध्यक्षपदी पंकज कांबळे, उपाध्यक्षपदी करण सूर्यवंशी, सचिवपदी शैलेश कांबळे, महासचिवपदी धीरज सुरवसे, संघटकपदी प्रवीण चव्हाण, महासंघटकपदी प्रेम कांबळे, खजिनदार सुमित हजारे, वरिष्ठ सल्लागार निलेश कांबळे, सल्लागार दर्शन कांबळे आणि महासल्लागार भोलेनाथ चव्हाण यांची निवड करण्यात आली. या पदाधिकाऱ्यांना उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
शाखेच्या अनावरण प्रसंगी गावातील अनेक ग्रामस्थ आणि समाजबांधव उपस्थित होते. या सोहळ्यात मधुकर कांबळे, राहुल कार्लेकर, गौतम कसबे, राहुल शिंदे, रोशनील आदमाने, शुभम चव्हाण, सुमेध कांबळे, अमोल चव्हाण, प्रणव धावारे, संदीप आंगरे, योगेश चव्हाण, रितेश धावारे, राजू कांबळे, सूरज चव्हाण, शिवरत्न कांबळे, सौरभ वाघमारे, आकाश कांबळे यांसह अनेक पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमात भीम आर्मीत मोठ्या संख्येने नवीन सदस्यांचा सहभाग झाला. गावकऱ्यांनी या नवीन शाखेचे स्वागत केले आणि भीम आर्मीच्या कार्याला पाठिंबा दर्शविला.
dr Babasaheb Ambedkar, Bahujan