दि. २३ जानेवारी २०२५ गुरुवारला सत्यशोधक समाज, ता. मौदा जि. नागपूर कडुन तहसीलदार मौदा यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
१. मंडल आयोगाचा अहवाल जश्याचा तसा लागु करण्यात यावा.
२. ओ.बी.सी. ची जणगणना करण्यात यावी व त्याप्रमाणात केंद्रसरकार, राज्यसरकार व सार्वजणीक क्षेत्रातील उपक्रमात सर्वच स्तरावर आरक्षण देण्यात यावे तसेच पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे.
३. सन २०२४-२५ शैक्षणीक वर्ष सुरु होवूनही आजपर्यंत ओबीसी विदयार्थ्यांना वस्तीगृह मिळालेले नाही तरी तातडीने वस्तीगृह सुरु करुन विदयार्थ्यांना देण्यात यावेत व जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावर ओबीसी विद्यार्थ्यांकरीता वस्तीगृह बांधण्यात यावे.
४. ओ.बी.सी. विद्यार्थ्यांकरीता जिल्हास्तरावर नागरी सेवा परिक्षेचे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात यावे जेणेकरुन विद्यार्थी आयएएस, आयपीएस, एमपीएससी चे प्रशिक्षण घेवून अधिकारी होवू शकतील.
५. ओ.बी.सी. विद्यार्थ्यांना नियीमत स्कॉलरशिप देण्यात येत नाही. तरी ती नियीमत देण्यात यावी.
६. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरीता जास्त व्याजदराने कर्ज देण्यात येते ते कर्ज १ ते २ टक्के व्याजदराने देण्यात यावे.
७. शेतक-यांना जागेच्या अभावी त्यांचे धान्याला भाव नसतांही धान्य विक्री करावे लागते, तरी धान्य साठवून ठेवण्याकरीता ग्रामपंचायत/तालुकास्तरावर गोदाम बांधण्यात यावे.
अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले, यावेळी रमेश वाघाळे,जगदिश वाडिभस्मे,ईश्वर डहाके,राजेंद्र पिसे,प्रमोद पिसे,रणभिर भोयर,प्रदीप शिवणकर,सतीश भोयर,चंद्रशेखर मोटघरे,स्वप्निल श्रावनकर,राजेश ठवकर,मुन्ना जुमळे,मोहन भिवगडे,शेषराव सावे,मनिषा राऊत,युवराज बेहरे,गुलाब तुरणकर,वंदना मदनकर,केशव कुंजळकर,अरुण क्षिरसागर,मधुकर काळबांडे,उमाकांत कांबळे,अंदरावजी भोयर,नितेश वांगे,भगवान पिकलमुंडे,तुळशीराम बसेशंकर इ सत्यशोधक समाजाचे सदस्य उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Mandal commission